धरणगाव, प्रतिनिधी – येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी नगरसेविका रुपाली पवन देवरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राज्य संत सावता माळी युवक संघाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
स्थानिक सामाजिक संघटनेच्या वतीने सौ. देवरे यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या सत्कार प्रसंगी संत सावता माळी युवक संघाचे विभागीय अध्यक्ष विनायक महाजन, तालुकाध्यक्ष दिनेश महाजन, जॉनी महाजन, भूषण महाजन, योगेश महाजन, शुभम महाजन यांच्यासह संघटनेचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





