• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांची बोळवण करणाऱ्या ‘त्या’ ५ हजारात मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करून दाखवावी !

धरणगाव शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख भागवत चौधरी यांचा सरकारवर घणाघाती हल्ला

खान्देशदूत by खान्देशदूत
October 15, 2026
in जळगाव जिल्हा, ब्रेकिंग
0
शेतकऱ्यांची बोळवण करणाऱ्या ‘त्या’ ५ हजारात मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करून दाखवावी !
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सत्ताधारी फडणवीस सरकारने केले आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना अवघी ५ हजार रुपयांची अग्रीम रक्कम देऊन त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. ५ हजार रुपयात दिवाळी साजरी करण्याचा दावा करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वाभिमानी शेतकऱ्यांची उघड्यावर थट्टा करत आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धरणगाव शहरप्रमुख भागवत चौधरी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करत उपरोधिक निवेदनाद्वारे सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे.

५ हजार रुपयात कपडे तर दूर, तेल-तुपही येत नाही !

भागवत चौधरी यांनी सध्याच्या तीव्र महागाईचा पाढा वाचत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “आज बाजारात केवळ गोडेतेलाच्या एका डब्याची किंमत तीन हजार रुपयांच्या पार गेली आहे. उर्वरित दोन हजारात कुटुंबियांसाठी कपडेलत्ते, दिवाळीचा फराळ, आणि सणावाराचा इतर खर्च कसा करायचा? महागाई आकाशाला भिडलेली असताना ५ हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे,” असे चौधरी यांनी ठणकावून सांगितले.

‘माझ्या हिश्शाचे ५ हजार फडणवीसांच्या खात्यात जमा करा ; बोळवणीचे सामान खरेदी करा !’

शासनाच्या या तुटपुंज्या मदतीवर आक्रमक भूमिका घेत भागवत चौधरी यांनी अत्यंत कडक अन् उपरोधिक सल्ला दिला आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “शेतकऱ्यांना दुष्काळ आणि महागाईच्या खाईत ढकलून ५ हजार रुपयांची भीक देण्यापेक्षा ही रक्कम सरकारने स्वतःकडेच ठेवावी आणि आपल्या खाजगी विकासकामांसाठी वापरून घ्यावी. सरकारचे ५ हजार रुपये घेऊन मिंधे होण्यापेक्षा, माझ्या हक्काच्या मदतीची ५ हजार रुपयांची रक्कम थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. त्या पैशातून सरकारने स्वतःसाठी ‘बोळवणीचे सामान’ खरेदी करावे!” असं भागवत चौधरी यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे धरणगाव तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या भावनांना वाट मोकळी झाली आहे. तोंडावर आलेल्या दिवाळीच्या काळात सरकारने तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांचा अपमान केल्याची तीव्र भावना निर्माण झाली असून, भागवत चौधरी यांनी दिलेल्या या उपरोधिक निवेदनामुळे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

‘सरकारने ५ हजार रुपये देऊन शेतकऱ्यांना मिंधे करण्याचा प्रयत्न करू नये. ५ हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होत असेल, तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः ५ हजार रुपयात आपली दिवाळी साजरी करून दाखवावी.’

— भागवत चौधरी
धरणगाव शहरप्रमुख,
शिवसेना उबाठा

Previous Post

दुष्काळग्रस्तांसाठी आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांची २१ हजारांची देणगी

Next Post

धरणगाव रेल्वे स्थानकात ‘आरपीएएफ’ (RPF) आउटपोस्ट सुरू होण्याचा मार्ग सुकर

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
धरणगाव रेल्वे स्थानकात ‘आरपीएएफ’ (RPF) आउटपोस्ट सुरू होण्याचा मार्ग सुकर

धरणगाव रेल्वे स्थानकात 'आरपीएएफ' (RPF) आउटपोस्ट सुरू होण्याचा मार्ग सुकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे ‘इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात

धरणगाव महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे ‘इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात

October 17, 2026
धरणगाव रेल्वे स्थानकात ‘आरपीएएफ’ (RPF) आउटपोस्ट सुरू होण्याचा मार्ग सुकर

धरणगाव रेल्वे स्थानकात ‘आरपीएएफ’ (RPF) आउटपोस्ट सुरू होण्याचा मार्ग सुकर

October 15, 2026
शेतकऱ्यांची बोळवण करणाऱ्या ‘त्या’ ५ हजारात मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करून दाखवावी !

शेतकऱ्यांची बोळवण करणाऱ्या ‘त्या’ ५ हजारात मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करून दाखवावी !

October 15, 2026
दुष्काळग्रस्तांसाठी आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांची २१ हजारांची देणगी

दुष्काळग्रस्तांसाठी आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांची २१ हजारांची देणगी

October 2, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914