• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगाव तालुक्यासाठी ‘शेतकरी आत्महत्या समिती’ गठीत

कल्याणे खुर्द येथील सोपान बोरसे आणि पाळधी बुद्रुकचे अरुण पाटील यांची निवड

खान्देशदूत by खान्देशदूत
May 10, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगाव तालुक्यासाठी ‘शेतकरी आत्महत्या समिती’ गठीत
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कल्याणासाठी राज्य शासनाच्या धोरणानुसार धरणगाव तालुक्यासाठी स्वतंत्र ‘शेतकरी आत्महत्या समिती’ गठीत करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले असून, या समितीद्वारे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करून अहवाल जिल्हा स्तरावर सादर केला जाणार आहे.

​समितीची रचना आणि सदस्य

या समितीच्या अध्यक्षपदी उपविभागीय अधिकारी (एरंडोल भाग) स्वतः राहणार असून सदस्य सचिव म्हणून धरणगावच्या तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश आहे.

​प्रशासकीय सदस्यांमध्ये गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सहायक निबंधक (सहकारी संस्था), अग्रणी बँकेचे तालुका प्रतिनिधी, महात्मा फुले जन आरोग्य अभियानाचे तालुका समन्वयक आणि पशुसंवर्धन सहायक आयुक्त यांचा तर शेतकरी प्रतिनिधी म्हणून कल्याणे खुर्द येथील सोपान नामदेव बोरसे तर सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी म्हणून पाळधी बुद्रुक येथील अरुण एकनाथ पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

​दरमहा होणार बैठका

शासकीय निर्णयानुसार (दि. ७ एप्रिल २०२६), या समितीने आपल्या कार्यक्षेत्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रकरणांची छाननी करून ती निकाली काढणे आवश्यक आहे. समितीचे सदस्य सचिव यांनी अध्यक्षांच्या मान्यतेने दरमहा बैठकीचे आयोजन करावे आणि घेतलेले निर्णय अंतिम मान्यतेसाठी जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावेत, असे निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत. शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Previous Post

धरणगाव बस स्थानकात उद्या ‘शिवकमल जलसेवा’ वॉटर कुलरचे लोकार्पण

Next Post

धरणगावात भव्य वारकरी बालसंस्कार निवासी शिबिरासह ‘कीर्तन महोत्सवा’चे आयोजन

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
धरणगावात भव्य वारकरी बालसंस्कार निवासी शिबिरासह ‘कीर्तन महोत्सवा’चे आयोजन

धरणगावात भव्य वारकरी बालसंस्कार निवासी शिबिरासह 'कीर्तन महोत्सवा'चे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

July 18, 2026
धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

July 18, 2026
मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

July 15, 2026
धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

July 15, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914