• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगाव बस स्थानकात उद्या ‘शिवकमल जलसेवा’ वॉटर कुलरचे लोकार्पण

ना.गुलाबराव पाटलांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती

खान्देशदूत by खान्देशदूत
May 10, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगाव बस स्थानकात उद्या ‘शिवकमल जलसेवा’ वॉटर कुलरचे लोकार्पण
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – येथील बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘शिवकमल जलसेवा’ या भव्य वॉटर कुलरचे लोकार्पण करण्यात येणार आहे. हा सोहळा सोमवार, ११ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. स्व. कमलाबाई शिवराजजी कोठारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोठारी परिवारातर्फे वाॅटर कुलर देण्यात आले आहे.

​या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील भूषविणार आहेत. त्यांच्याच हस्ते या जलसेवेचे विधिवत लोकार्पण करण्यात येईल. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न होईल.

​मान्यवरांची उपस्थिती

​याप्रसंगी धरणगावच्या नगराध्यक्षा सौ. लीलाताई चौधरी, उपनगराध्यक्षा सौ. सुरेखाताई महाजन, विभाग नियंत्रक प्रद्रनेश बोरसे, अर्बन बँकेचे चेअरमन प्रवीण कुडे, पोलीस निरीक्षक सुनील पवार, उद्योजक जीवन (आप्पा) बयस आणि एरंडोल आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

​प्रवाशांसाठी दिलासादायक उपक्रम

​धरणगाव बस स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता, प्रवाशांना शुद्ध आणि थंड पाणी मिळावे या सामाजिक भावनेतून महेंद्र शिवराजजी कोठारी (DRUCC सदस्य, पश्चिम रेल्वे) आणि रितेश महेंद्र कोठारी (पुणे) यांनी या वॉटर कुलरची व्यवस्था केली आहे. या उपक्रमासाठी धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे विशेष सहकार्य लाभले आहे.

​या लोकार्पण सोहळ्याला धरणगाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक महेंद्र कोठारी आणि कोठारी परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

ओटीपीशिवाय गॅस वितरणाचा पर्याय सुरू ठेवा

Next Post

धरणगाव तालुक्यासाठी ‘शेतकरी आत्महत्या समिती’ गठीत

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
धरणगाव तालुक्यासाठी ‘शेतकरी आत्महत्या समिती’ गठीत

धरणगाव तालुक्यासाठी ‘शेतकरी आत्महत्या समिती’ गठीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

July 18, 2026
धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

July 18, 2026
मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

July 15, 2026
धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

July 15, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914