धरणगाव, प्रतिनिधी – येथील रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिक रामदास सखाराम माळी (आर. एस. माळी) यांचे आज शुक्रवार, दिनांक १२ जून २०२६ रोजी रात्री १२:१५ वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते धरणगाव येथील प्रसिद्ध वकील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ॲड. शरद रामदास माळी यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रामदास माळी (आर. एस. माळी) हे आपल्या मनमिळाऊ आणि शांत स्वभावासाठी परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनाने माळी परिवारावर शोककळा पसरली असून धरणगाव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
आज सकाळी १० वाजता अंत्ययात्रा
त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार, दि. १२ जून २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून (महावीर पार्क, धरणगाव, ता. धरणगाव) निघणार आहे. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील अमरधाम (स्मशानभूमी) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.



