धरणगाव, प्रतिनिधी – येथील रहिवासी आणि नूतन सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन वामन बाजीराव बिऱ्हाडे यांचे आज, २९ एप्रिल (बुधवार) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने धरणगाव परिसरासह बिऱ्हाडे परिवारावर शोककळा पसरली आहे.
स्व. वामन बिऱ्हाडे यांनी नूतन सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणून सामाजिक आणि सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात तीन मुले राजेंद्र बिऱ्हाडे, शामकांत बिऱ्हाडे, प्रल्हाद बिऱ्हाडे, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गुरूवारी अंत्ययात्रा
बिऱ्हाडे परिवाराने दिलेल्या माहितीनुसार, स्व. वामन बिऱ्हाडे यांची अंत्ययात्रा उद्या गुरुवार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता निघणार आहे. धरणगाव पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रेला सुरुवात होईल. मार्केट कमिटी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.





