• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home संपादकीय

प्रथमेश मोहोळ : कर्तव्य, माणुसकी आणि जिव्हाळ्याचा प्रवास…

खान्देशदूत by खान्देशदूत
May 15, 2026
in संपादकीय
0
प्रथमेश मोहोळ : कर्तव्य, माणुसकी आणि जिव्हाळ्याचा प्रवास…
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संकटात जो धावून येतो,
तोच खरा माणूस ठरतो…
पदापेक्षा कर्म मोठं असतं,
हेच आयुष्य शिकवून जातं…!

कोरोना महामारीचा काळ…

भीती, अनिश्चितता आणि असंख्य अडचणींनी भरलेला तो काळ आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे. त्या कठीण परिस्थितीत अनेक अधिकारी आपल्या कर्तव्यावर ठाम उभे राहिले. धरणगावचे तत्कालीन नायब तहसीलदार आणि आमचे मित्र प्रथमेश मोहोळ हे त्यापैकीच एक संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व.

लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवताना त्यांनी केवळ अधिकारी म्हणून नव्हे, तर माणुसकी जपणारा चेहरा म्हणून काम केले. गरजूंना मदतीचा हात, प्रशासनात समन्वय आणि प्रत्येकाशी आत्मीयतेने संवाद — या गुणांमुळे त्यांनी लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.

चेहऱ्यावर साधेपणा,
मनामध्ये सेवाभाव…
अशाच माणसांमुळे टिकून आहे,
समाजातील विश्वास आणि भाव…!

कोरोनाच्या कठीण दिवसांत अनेकांना धीर देत, प्रशासनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडताना त्यांनी दाखवलेली कार्यतत्परता आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शांतपणे आणि संयमाने निर्णय घेण्याची त्यांची शैली सर्वांना प्रेरणा देणारी ठरली. प्रशासनातील अनुभव, लोकांशी असलेला जिव्हाळा आणि कामावरील निष्ठा यामुळे ते सर्वांच्या विश्वासाचे व्यक्तिमत्त्व बनले आहेत.

नाती जपणं आणि माणसं जोडणं,
हीच खरी श्रीमंती असते…
पदं येतात आणि जातात,
पण माणुसकी कायम स्मरणात राहते…

वाढदिवस हा केवळ आनंदाचा क्षण नसतो, तर एखाद्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव करण्याचा दिवस असतो. प्रथमेश मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

आयुष्यात यशाची उंच भरारी मिळो,
प्रत्येक क्षण आनंदाने फुलो…
समाजसेवेचा हा प्रवास असाच सुरू राहो,
आणि
कार्याने आपण प्रत्येकाच मन जिंकत राहो…
याच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा…!

भरत चौधरी
वरीष्ठ पत्रकार

Previous Post

​शासनाचा आदेश असतानाही बेकायदेशीर निविदा प्रक्रिया : सभागृहाची दिशाभूल

Next Post

धरणगावात पवार पेट्रोलपंप चालकाची अशी संवेदना…

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
धरणगावात पवार पेट्रोलपंप चालकाची अशी संवेदना…

धरणगावात पवार पेट्रोलपंप चालकाची अशी संवेदना...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

September 4, 2026
धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

August 28, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

August 25, 2026
धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

August 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914