• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगावात पवार पेट्रोलपंप चालकाची अशी संवेदना…

खिचडीचे भोजन दिले शेतकरी ग्राहकांना...!

खान्देशदूत by खान्देशदूत
May 20, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगावात पवार पेट्रोलपंप चालकाची अशी संवेदना…
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रा.बी.एन.चौधरी
धरणगाव – पेट्रोल, डिझेलची टंचाई दिवसेंदिवस आक्राळविक्राळ स्वरुप धारण करत असून पेट्रोलपंपावर ग्राहकांची जीवघेणी गर्दी वाढत आहे. शेतकऱ्यांचे हे कामाचे दिवस असून त्यांना ट्रॅक्टरसाठी मोठ्या प्रमाणावर डिझेल लागते. यासाठी शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर डबे, कॅन, टाक्या रांगेत लावून नंबर लावले आहे. दिवसभर थकलेल्या अश्या शेतकऱ्यांना येथील पवार पेट्रोलपंप संचालक चंदन दिलिपराव पाटील यांनी माणुसकीच्या संवेदनेतून रात्रीच्या भोजनाची पेट्रोलपंपवरच व्यवस्था केली आहे. पेट्रोल घ्यायला आलेले शेतकरी, ग्राहक पंक्तीत खिचडीचा आस्वाद घेत पेट्रोलपंप संचालकांना धन्यवाद देत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेले पेट्रोल, डिझेल बचतीचे आवाहन सर्वदूर पोहचले आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पेट्रोल डिझेलची टंचाई जाणवू लागली आहे. काही पंप बंद झाले आहेत तर काही पंपावर ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. यातून वादविवाद, अरेरावी, विसंवाद, वितंडवाद, मारामाऱ्या यांचे दर्शन घडत आहे. असाच गर्दीचा प्रकार शहरातील चोपडा रोडवरील पवार पेट्रोलपंपवरही दिसून आला. डिझेल साठी ग्राहकांनी भर उन्हात आपल्या डब्यासंह रांगा लावल्या आहेत. वाट पाहून पाहून संध्याकाळ झाली तरी ग्राहक जागा सोडायला तयार नव्हते. डिझेल टॅकर रात्री उशिरा येईल अशी सूचना कर्मचाऱ्यांनी देऊनही ग्राहक जागा सोडायला तयार नव्हते. जेवणाची वेळ झाली तरी ते तेथेच ठाण मांडून बसले होते. शेवटी पेट्रोल पंपाचे संचालक यांनी माणुसकीच्या भावनेतून सर्वांसाठी खिचडीचा बेत आखला आणि सर्व शेतकरी ग्राहकांची पेट्रोल पंपावरच पंगती बसल्या. संचालक त्यांना आग्रहाने वाढत होते आणि शेतकरी बंधू आनंदाने भोजनाचा आनंद घेत होते. संचालकांच्या या छोट्याश्या कृतीतून त्यांनी माणुसकीचे अलौकीक दर्शन घडविल्याची चर्चा शेतकरी बांधव आपसात करत होते. व्यवसाय करायलाच हवा. मात्र, तो करतांना ग्राहक हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे.! असे प्रतिपादन संचालक डि. जी. पाटील यांनी व्यक्त केले. या घटनेची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि अन्नदाता सुखी भव.! ही भावना प्रत्येकाच्या ओठी आली.

Previous Post

प्रथमेश मोहोळ : कर्तव्य, माणुसकी आणि जिव्हाळ्याचा प्रवास…

Next Post

बारडोलीचे प्रा. निलेश पटेल यांना इतिहास विषयात पीएच.डी.

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
बारडोलीचे प्रा. निलेश पटेल यांना इतिहास विषयात पीएच.डी.

बारडोलीचे प्रा. निलेश पटेल यांना इतिहास विषयात पीएच.डी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

September 4, 2026
धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

August 28, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

August 25, 2026
धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

August 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914