• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home ब्रेकिंग

पंकज कंखरे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच युवा आघाडी

खान्देशदूत by खान्देशदूत
April 11, 2026
in ब्रेकिंग
0
पंकज कंखरे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
0
SHARES
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच युवा आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी धरणगाव येथील युवा नेतृत्व पंकज पुना कंखरे यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथील महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच या संस्थेचे सरचिटणीस डॉ.जे.पी.बघेल यांनी एका पत्राद्वारे पंकज कंखरे यांची तिन वर्षांसाठी ही निवड केली आहे.

धरणगाव शहरातील राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्राच्या जळणघडणीत महत्त्वाचा वाटा असलेल्या पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष स्व. पुना सिताराम कंखरे आणि माजी उपनगराध्यक्षा श्रीमती अरूणाताई कंखरे या दाम्पत्याचे पुत्र असलेल्या पंकज कंखरे यांनी सामाजिक कार्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघ क्षेत्राची जबाबदारी पंकज कंखरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. संस्थेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी संस्थेच्या जिल्ह्यातील इतर कार्यकारी सदस्यांशी समन्वय साधून, विभागाच्या जिल्हाध्यक्षांना त्यांच्या कार्यात साहाय्य करण्याची जबाबदारी पंकज कंखरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. समाज आणि संस्थेच्या हितासाठी आपले सर्वोत्तम योगदान देण्यासह समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी परिश्रम घेणार असल्याचा संकल्प पंकज पुना कंखरे यांनी केला आहे.

पंकज कंखरे यांच्या नियुक्तीचे जिल्ह्यात स्वागत होत आहे. समाजसेवेचा बाळकडू आपण पंकजला दिला आहे. समाजातील गोरगरीब, शोषित-पिडीत-वंचितांची सेवा पंकजच्या हातून घडावी, समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यानेही खारीचा वाटा उचलावा ही अपेक्षा असून महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचच्या अध्यक्षांनी टाकलेली जबाबदारी पंकज यशस्वीपणे पार पाडेल असा विश्वास माजी उपनगराध्यक्षा श्रीमती अरुणाताई पुना कंखरे यांनी व्यक्त करून पंकज कंखरे यांना शुभेच्छा दिल्या.

Previous Post

पालिकेच्या कामगारांचा पाडवा ‘गोड’ झाला!

Next Post

लेखापरीक्षक प्रकाश चौधरी यांचा धरणगावात सत्कार

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
लेखापरीक्षक प्रकाश चौधरी यांचा धरणगावात सत्कार

लेखापरीक्षक प्रकाश चौधरी यांचा धरणगावात सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

मुलांना औताला जुंपणाऱ्या बापाचे अश्रू पुसत अशोकभाऊंनी सुपूर्द केली बैलजोडी…!

मुलांना औताला जुंपणाऱ्या बापाचे अश्रू पुसत अशोकभाऊंनी सुपूर्द केली बैलजोडी…!

June 18, 2026
धरणगाव नुतन विविध कार्यकारी सोसायटीत महिला राज

धरणगाव नुतन विविध कार्यकारी सोसायटीत महिला राज

June 18, 2026
​महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त ‘समर्पण संस्थे’चा स्तुत्य उपक्रम

​महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त ‘समर्पण संस्थे’चा स्तुत्य उपक्रम

June 18, 2026
‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी

‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी

June 16, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914