• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगावात फिरते नेत्रालय उपक्रम: १५० रुग्णांची नेत्र तपासणी

३६ जणांवर होणार शस्त्रक्रिया ​: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची शिबिराला भेट

खान्देशदूत by खान्देशदूत
May 9, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगावात फिरते नेत्रालय उपक्रम: १५० रुग्णांची नेत्र तपासणी
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर जी.पी.एस. मित्रपरिवार, शिवसेना आणि डॉ. श्रीकांत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘फिरते नेत्रालय’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात धरणगाव शहर व परिसरातील १५० हून अधिक रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली.

​विविध तपासण्या व चष्मा वाटप

​या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे मोतीबिंदू तपासणी, दृष्टीदोष तपासणी आणि चष्म्याचे नंबर काढणे यांसारख्या सेवा मोफत देण्यात आल्या. दिवसभरात झालेल्या तपासणीमध्ये एकूण १५० रुग्णांची नोंदणी झाली. त्यापैकी ३६ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले असून, त्यांच्यावर लवकरच मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच ४७ रुग्णांना आवश्यकतेनुसार चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

​पालकमंत्र्यांकडून पाहणी

​राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. गुलाबराव पाटील यांनी शिबिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य पथकाशी चर्चा करून शिबिराच्या नियोजनाची माहिती घेतली. तसेच उपस्थित रुग्णांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. सामाजिक बांधिलकीतून राबविल्या जाणाऱ्या अशा उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळतो, अशा शब्दांत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.

​जेष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग

​शिबिराचा लाभ घेण्यासाठी धरणगाव परिसरातील सर्व समाजातील जेष्ठ नागरिक, महिला आणि माता-भगिनींनी मोठी गर्दी केली होती. जी.पी.एस. मित्रपरिवार, शिवसेना परिवार आणि डॉ. श्रीकांत फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शिबिराचे नेटके नियोजन केले होते.

​याप्रसंगी डॉ. श्रीकांत फाउंडेशनची वैद्यकीय टीम, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तपासणी झालेल्या सर्व रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आयोजकांचे आभार मानले आहेत.

Previous Post

दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे ‘मनोबल’ राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचे आयोजन

Next Post

ओटीपीशिवाय गॅस वितरणाचा पर्याय सुरू ठेवा

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
ओटीपीशिवाय गॅस वितरणाचा पर्याय सुरू ठेवा

ओटीपीशिवाय गॅस वितरणाचा पर्याय सुरू ठेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

राज्यात पुन्हा कर्जमाफीची घोषणा; २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती

राज्यात पुन्हा कर्जमाफीची घोषणा; २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती

June 2, 2026
भरधाव पिकअपची भीषण धडक : शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

भरधाव पिकअपची भीषण धडक : शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

June 2, 2026
​५८ लाख कुणबी नोंदींचा डेटा देण्यास सरकार तयार…!

​५८ लाख कुणबी नोंदींचा डेटा देण्यास सरकार तयार…!

May 31, 2026
धरणगावात ‘कोथरी’ दारू ठरतेय तरुणाईसाठी कर्दनकाळ

धरणगावात ‘कोथरी’ दारू ठरतेय तरुणाईसाठी कर्दनकाळ

May 30, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914