• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लोकहितार्थ काम पूर्णत्वास नेण्याची गुलाबरावांची जिद्द कौतुकास्पद

उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या कडून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा

खान्देशदूत by खान्देशदूत
June 4, 2026
in महाराष्ट्र, ब्रेकिंग
0
लोकहितार्थ काम पूर्णत्वास नेण्याची गुलाबरावांची जिद्द कौतुकास्पद
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, प्रतिनिधी : राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्राद्वारे त्यांचे विशेष अभिष्टचिंतन केले आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या अफाट कार्यशैलीने आणि मनमिळावू स्वभावाने जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.

​उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी ४ जून २०२६ रोजी पाठवलेल्या या अधिकृत पत्रात ना. गुलाबराव पाटील यांच्या कामाचा गौरव केला असून त्यांच्या भावी आयुष्यासाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली आहे.

​जल जीवन मिशनचे काम झपाट्याने पूर्ण

​उपमुख्यमंत्र्यांनी पत्रात ना. गुलाबराव पाटील यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील कामगिरीचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. “राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून आपण करीत असलेले कार्य नक्कीच प्रशंसनीय आहे. विशेषतः ग्रामीण भागात ‘जल जीवन मिशन’चे काम अतिशय झपाट्याने पूर्ण होत आहे,” अशा शब्दांत त्यांनी पाटील यांच्या प्रशासकीय गतीचे कौतुक केले आहे.

​पत्रातील महत्त्वाचे मुद्दे आणि गौरवद्गार

​लोकाभिमुख नेतृत्व: ना. गुलाबराव पाटील यांचा मनमिळावू स्वभाव, प्रेम, आपुलकी, स्नेह यासोबतच कामातील निष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांनी जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.

​कामाची जिद्द: लोकहितार्थ एखादे काम पूर्णत्वास नेण्यासाठी ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे असलेली जिद्द खरोखरच कौतुकास्पद आहे.

​पायाभूत सुविधांवर भर: ग्रामीण तसेच शहरी भागात स्वच्छ पाणी पुरवठा, स्वच्छता व्यवस्था आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.

​नवनवीन संकल्पना: त्यांच्या माध्यमातून विभागासंबंधी नवनवीन संकल्पना आणि लोकोपयोगी उपक्रम आगामी काळातही राबविले जातील आणि हा विभाग अधिक लोकाभिमुख होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

​”जनसेवेची आपली ऊर्जा अखंड अशीच कायम राहो,” अशी सदिच्छा व्यक्त करत उपमुख्यमंत्र्यांनी ना. गुलाबराव पाटील यांना वाढदिवसाच्या पुनश्च मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्रानंतर राजकीय वर्तुळात आणि खान्देशात ना. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.

Previous Post

मुंबईची ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत आता महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात

Next Post

शासकीय कार्यालयांत आता जेवणाची वेळ निश्चित

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
शासकीय कार्यालयांत आता जेवणाची वेळ निश्चित

शासकीय कार्यालयांत आता जेवणाची वेळ निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

September 4, 2026
धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

August 28, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

August 25, 2026
धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

August 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914