• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home ब्रेकिंग

केरळमध्ये ईडीची मोठी कारवाई

माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरावर धाड!

खान्देशदूत by खान्देशदूत
May 27, 2026
in ब्रेकिंग, राष्ट्रीय
0
केरळमध्ये ईडीची मोठी कारवाई
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तिरुवनंतपुरम, वृत्तसंस्था – केरळचे माजी मुख्यमंत्री आणि डाव्या आघाडीचे ज्येष्ठ नेते पिनराई विजयन यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज सकाळीच विजयन यांच्या तिरुवनंतपुरम येथील निवासस्थानासह राज्यभरातील तब्बल १२ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. विजयन यांच्या कन्या टी. वीणा यांच्या आयटी कंपनीशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग आणि बेकायदेशीर व्यवहारांप्रकरणी ही कारवाई करण्यात येत असल्याने केरळच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हा संपूर्ण वाद ‘कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड’ या खाजगी कंपनी आणि विजयन यांच्या कन्या टी. वीणा यांच्या ‘एक्सालॉजिक सॉल्यूशन्स’ या आयटी कंपनीमधील संशयास्पद आर्थिक व्यवहारांशी संबंधित आहे. आरोपानुसार, २०१७ ते २०२० या कालावधीत सीएमआरआय कंपनीने टी. वीणा यांच्या कंपनीला तब्बल १.७२ कोटी रुपयांचे मासिक पेमेंट केले होते. विशेष म्हणजे, या आयटी कंपनीने सीएमआरआय ला कोणतीही सेवा किंवा सर्व्हिस पुरवली नसतानाही ही कोट्यवधी रुपयांची रक्कम देण्यात आली, असा ठपका ‘आयकर सेटलमेंट बोर्डा’ने ठेवला होता. याच संशयास्पद व्यवहारावरून ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत हा तपास सुरू केला आहे.

उच्च न्यायालयाच्या हिरव्या कंदीलानंतर कारवाई तीव्र

कालच (मंगळवारी) केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. ‘सीएमआरआय’ कंपनीने ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी आणि तपास रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती, जी न्यायालयाने फेटाळून लावली. उच्च न्यायालयाकडून तपास सुरू ठेवण्यास हिरवा कंदील मिळताच, ईडीच्या १२ सदस्यीय पथकाने केंद्रीय सुरक्षा दलाचा कडक बंदोबस्तात आज पहाटेपासूनच केरळमध्ये शोधमोहीम तीव्र केली.

नातेवाईक आणि निकटवर्तीयांवरही पाश

ईडीने केवळ विजयन यांच्याच नव्हे, तर त्यांचे जावई आणि माजी मंत्री मोहम्मद रियास यांच्या कोझिकोड येथील घरावरही छापे मारले आहेत. तसेच कोच्ची येथील सीएमआरआय कंपनीचे कॉर्पोरेट ऑफिस आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शशीधरन कार्था यांच्या मालमत्तांचीही झडती घेतली जात आहे. ईडीचे अधिकारी सध्या विजयन आणि त्यांची मुलगी वीणा यांची चौकशी करत असून डिजिटल पुरावे आणि कागदपत्रे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
विजयन यांनी नुकतेच मुख्यमंत्री पदावरून पायउतार होत विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळली आहे. त्यातच केंद्रीय तपास यंत्रणेने थेट त्यांच्या घरावर धडक दिल्याने राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

Previous Post

​राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला !

Next Post

​निवडणूक आयोगाच्या ‘SIR’ प्रक्रियेवर ‘सर्वोच्च’ मोहर

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
​निवडणूक आयोगाच्या ‘SIR’ प्रक्रियेवर ‘सर्वोच्च’ मोहर

​निवडणूक आयोगाच्या 'SIR' प्रक्रियेवर 'सर्वोच्च' मोहर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

September 4, 2026
धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

August 28, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

August 25, 2026
धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

August 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914