• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home ब्रेकिंग

​निवडणूक आयोगाच्या ‘SIR’ प्रक्रियेवर ‘सर्वोच्च’ मोहर

मतदार यादीतून नावे वगळण्याबाबत महत्वाचे निर्देश!

खान्देशदूत by खान्देशदूत
May 27, 2026
in ब्रेकिंग, राष्ट्रीय
0
​निवडणूक आयोगाच्या ‘SIR’ प्रक्रियेवर ‘सर्वोच्च’ मोहर
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमध्ये फेरबदल आणि शुद्धीकरणासाठी राबवलेल्या विशेष सघन पुनरीक्षण प्रक्रियेला आज सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे वैध ठरवले आहे. ही प्रक्रिया केवळ प्रशासकीय सोयीसाठी नसून, देशात ‘मुक्त आणि न्याय्य निवडणुका’ पार पाडण्यासाठी हे निवडणूक आयोगाचे घटनात्मक कर्तव्यच आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाने या प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या.

​सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने आज हा निकाल दिला. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आणि इतर काही याचिकाकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या या भूमिकेला न्यायालयात आव्हान दिले होते.

​केवळ प्रक्रियेतील त्रुटींमुळे ‘एसआयआर’ अवैध ठरणार नाही
​सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले की, एखादी प्रक्रिया केवळ तिच्या काही तांत्रिक कार्यपद्धतींमध्ये काटेकोरपणे बसत नाही म्हणून ती पूर्णपणे अवैध ठरवली जाऊ शकत नाही. निवडणूक आयोगाची ‘एसआयआर’ मोहीम लोकप्रतिनिधी कायदा आणि १९६० च्या नियमांच्या कक्षेत राहूनच राबवली गेली आहे. मतदार यादीतून बोगस किंवा दुबार नावे काढून यादी अचूक करणे हा निवडणूक आयोगाचा वैधानिक अधिकार आहे.

​नागरिकत्वाच्या मुद्द्यावर न्यायालयाचे मोठे स्पष्टीकरण

​याचिकाकर्त्यांनी आरोप केला होता की, निवडणूक आयोग ‘एसआयआर’ च्या माध्यमातून एनआरसी सारखी प्रक्रिया राबवत असून लोकांचे नागरिकत्व तपासत आहे. यावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले:

​”निवडणूक आयोग मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या मर्यादित उद्देशासाठी नागरिकत्वाची प्राथमिक पडताळणी करू शकतो. मात्र, निवडणूक आयोगाने मतदार यादीतून नाव वगळले म्हणजे त्या व्यक्तीचे देशाचे नागरिकत्व संपले, असा त्याचा अंतिम अर्थ होत नाही.” न्यायालयाने निर्देश दिले की, जर मतदार योग्य कागदपत्रे सादर करू शकले नाहीत, तर निवडणूक आयोग त्यांचे नाव मतदार यादीतून वगळू शकतो. मात्र, अशी नावे वगळल्यानंतर निवडणूक आयोगाने ती प्रकरणे अंतिम निर्णयासाठी केंद्र सरकारच्या सक्षम प्राधिकरणाकडे नागरिकत्व कायद्याच्या अंतर्गत पाठवणे आवश्यक आहे.

​पार्श्वभूमी काय होती?

​निवडणूक आयोगाने देशातील बोगस आणि स्थलांतरित मतदारांची छाटणी करण्यासाठी ‘एसआयआर’ मोहीम सुरू केली होती. पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात आली, जिथे ड्राफ्ट लिस्टमधून सुमारे ६५ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली होती. यात २००२ किंवा २००३ च्या मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना आपल्या पूर्वजांची माहिती देणे बंधनकारक केले होते. या अटीमुळे खऱ्या आणि गरीब मतदारांवर अन्याय होत असल्याचा दावा करत याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर आज न्यायालयाने पडदा टाकला असून निवडणूक आयोगाची कारवाई योग्य ठरवली आहे.

Previous Post

केरळमध्ये ईडीची मोठी कारवाई

Next Post

पत्नी म्हणजे खरेदी केलेली वस्तू किंवा मोलकरीण नाही…!

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
पत्नी म्हणजे खरेदी केलेली वस्तू किंवा मोलकरीण नाही…!

पत्नी म्हणजे खरेदी केलेली वस्तू किंवा मोलकरीण नाही...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

July 18, 2026
धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

July 18, 2026
मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

July 15, 2026
धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

July 15, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914