• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

लाच स्वीकारताना नशिराबादचा मंडळ अधिकाऱ्यासह पंटर एसीबीच्या जाळ्यात

शेतातील अवैध खोदकामाची तक्रार रद्द करण्यासाठी १ लाखाच्या लाचेची मागणी

खान्देशदूत by खान्देशदूत
May 12, 2026
in जळगाव जिल्हा
0
लाच स्वीकारताना नशिराबादचा मंडळ अधिकाऱ्यासह पंटर एसीबीच्या जाळ्यात
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, प्रतिनिधी – शेतातील अवैध खोदकामाची तक्रार बंद करण्यासाठी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारणाऱ्या नशिराबाद भागातील मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत एका खाजगी इसमाला देखील अटक करण्यात आली असून जळगावच्या रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
​नेमकी घटना काय?

तक्रारदार हे स्वतःच्या शेतात अवैध खोदकाम करत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी तहसील कार्यालयात केली होती. ही तक्रार नंतर मागे घेण्यात आली होती, मात्र, या अर्जाची चौकशी बंद करण्याच्या मोबदल्यात नशिराबाद भागाचे मंडळ अधिकारी मिलींद प्रकाश देवरे (वय ३७) यांनी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ५० हजार रुपये देण्याचे ठरले.

​पिंप्राळा तलाठी कार्यालयासमोर सापळा

मंडळ अधिकारी मिलींद देवरे यांनी लाचेची ही रक्कम खाजगी पंटर सुरेंद्र प्रल्हाद अहिरे (वय ३९) याच्याकडे देण्यास सांगितले. मंगळवारी, १२ मे २०२६ रोजी पिंप्राळा येथील तलाठी कार्यालयासमोर सुरेंद्र अहिरे याने तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारले असता, दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

​एसीबीचे पथक

ही कारवाई नाशिक ला.प्र.वि.चे पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक आणि त्यांच्या पथकाने (प्रफुल्ल माळी, विलास निकम) केली. या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव ला.प्र.वि.चे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करत आहेत. ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Previous Post

धरणगावात भव्य वारकरी बालसंस्कार निवासी शिबिरासह ‘कीर्तन महोत्सवा’चे आयोजन

Next Post

बारामतीत पुन्हा विमान कोसळले !

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
बारामतीत पुन्हा विमान कोसळले !

बारामतीत पुन्हा विमान कोसळले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

July 18, 2026
धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

July 18, 2026
मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

July 15, 2026
धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

July 15, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914