• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगावात भव्य वारकरी बालसंस्कार निवासी शिबिरासह ‘कीर्तन महोत्सवा’चे आयोजन

खान्देशदूत by खान्देशदूत
May 10, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगावात भव्य वारकरी बालसंस्कार निवासी शिबिरासह ‘कीर्तन महोत्सवा’चे आयोजन
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी): -येथील श्री संत कृपा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने २१ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत ‘भव्य वारकरी बालसंस्कार निवासी शिबिर’ आणि अधिकमास निमित्त ‘कीर्तन महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. नवेगाव, तेली तलाव जवळील मारोती मंदिरात हा सोहळा पार पडणार असून, परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दैनंदिन भरगच्च कार्यक्रम

या महोत्सवादरम्यान दररोज पहाटे ४ ते ६ प्रभात फेरी व काकडा आरती, सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ आणि रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तने रंगणार आहेत.

ख्यातनामक कीर्तनकारांची मांदियाळी

सप्ताहाची सुरुवात २१ मे रोजी भागवताचार्य ह.भ.प. भावेश महाराज (विटणेकर) यांच्या कीर्तनाने होईल. त्यानंतर पुढीलप्रमाणे सेवा होतील – २२ मे : गायनगंधर्व ह.भ.प. लिलाधर महाराज ओझरकर, २३ मे: ज्ञानसिंधू ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, २४ मे: कीर्तन केसरी ह.भ.प. मनोज महाराज एनगांवकर, २५ मे: संभाजीराजे चरीत्र व्याख्याते ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, २६ मे: गोप्रेमी ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, २७ मे: भागवताचार्य ह.भ.प. अतुल महाराज नारणेकर, २८ मे: सप्ताहाची सांगता महंत गायनगंधर्व ह.भ.प. अनिल महाराज धरणगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल.

विविध सेवांचे योगदान

या महोत्सवासाठी कलाकार मानधन, साऊंड सेवा, फुलहार, पत्रिका व संत निवास अशा विविध सेवा धरणगावातील दानशूर व्यक्ती व भाविकांकडून पुरस्कृत करण्यात आल्या आहेत.

आयोजक व नियोजन

या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी श्री संत कृपा वारकरी शिक्षण संस्था, माळी समाज पंच मंडळ, पाटील समाज पंच मंडळ, तिळवण तेली समाज पंच मंडळ, मराठे समाज पंच मंडळ आणि नवेगाव परिसरातील सर्व समाज बांधव परिश्रम घेत आहेत. या मंगलमय सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous Post

धरणगाव तालुक्यासाठी ‘शेतकरी आत्महत्या समिती’ गठीत

Next Post

लाच स्वीकारताना नशिराबादचा मंडळ अधिकाऱ्यासह पंटर एसीबीच्या जाळ्यात

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
लाच स्वीकारताना नशिराबादचा मंडळ अधिकाऱ्यासह पंटर एसीबीच्या जाळ्यात

लाच स्वीकारताना नशिराबादचा मंडळ अधिकाऱ्यासह पंटर एसीबीच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

September 4, 2026
धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

August 28, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

August 25, 2026
धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

August 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914