• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगावात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जेसीबीने हटवले रस्त्यालगतचे काटेरी रान…!

नगरसेविका भारती महाजन यांच्या पुढाकाराने संजय नगर परिसरात स्वच्छता मोहीम ; नागरिकांमधून समाधान

खान्देशदूत by खान्देशदूत
September 27, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगावात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जेसीबीने हटवले रस्त्यालगतचे काटेरी रान…!
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील संजय नगर परिसरात आगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धडक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्थानिक नगरसेविका सौ.भारती महाजन यांच्या पुढाकाराने जेसीबीच्या सहाय्याने परिसरातील काटेरी झाडे, झुडपे आणि वाढलेले गवत हटवून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत.

​सोनवद रस्त्यालगत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे-झुडपे व गवत वाढले होते. यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता. या समस्येबाबत संजय नगर परिसरातील नागरिकांनी प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका सौ.भारती महाजन यांच्याकडे तक्रार केली होती.

​नागरिकांच्या या समस्येची तत्परतेने दखल घेत नगरसेविका सौ.महाजन यांनी जेसीबी यंत्राची व्यवस्था करून संपूर्ण परिसराची स्वच्छता करून घेतली. आगामी नवरात्र उत्सवाच्या काळात परिसरात महिला, नागरिक व भाविकांची मोठी वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर रस्ता रुंद व स्वच्छ झाल्याने आता नागरिकांना सुरक्षित व मोकळ्या वातावरणात ये-जा करता येणार आहे.

या स्वच्छता मोहिमे दरम्यान युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमंत महाजन, सामाजिक कार्यकर्ते गोरख देशमुख, गोलू चौधरी, गोपाल माळी, सागर महाजन, राम महाजन, मुन्ना पैलवान, पिंटू महाजन, सोपान महाजन, बापू मराठे यांच्यासह प्रभाग क्रमांक २ मधील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐन सणाच्या तोंडावर परिसर स्वच्छ झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करून नगरसेविका सौ. भारती महाजन यांचे मनापासून आभार मानले.

‘नवरात्रोत्सवाच्या काळात शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी आणि माझे प्रशासन सातत्याने कटिबद्ध राहू.’

— सौ.भारती महाजन, नगरसेविका, प्रभाग क्र. २

Previous Post

धरणगावच्या नवनियुक्त उपनगराध्यक्षा रुपाली देवरे यांचा सत्कार

Next Post

दुष्काळग्रस्तांसाठी आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांची २१ हजारांची देणगी

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
दुष्काळग्रस्तांसाठी आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांची २१ हजारांची देणगी

दुष्काळग्रस्तांसाठी आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांची २१ हजारांची देणगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे ‘इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात

धरणगाव महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे ‘इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात

October 17, 2026
धरणगाव रेल्वे स्थानकात ‘आरपीएएफ’ (RPF) आउटपोस्ट सुरू होण्याचा मार्ग सुकर

धरणगाव रेल्वे स्थानकात ‘आरपीएएफ’ (RPF) आउटपोस्ट सुरू होण्याचा मार्ग सुकर

October 15, 2026
शेतकऱ्यांची बोळवण करणाऱ्या ‘त्या’ ५ हजारात मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करून दाखवावी !

शेतकऱ्यांची बोळवण करणाऱ्या ‘त्या’ ५ हजारात मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करून दाखवावी !

October 15, 2026
दुष्काळग्रस्तांसाठी आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांची २१ हजारांची देणगी

दुष्काळग्रस्तांसाठी आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांची २१ हजारांची देणगी

October 2, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914