• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगावात ‘तुकाराम मुंढे’ इफेक्ट ; भेसळ माफिया आणि बालकामगार ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले !

​'ऑन द स्पॉट' तपासणीचा धडाका; व्यापाऱ्यांमध्ये घबराट, सुट्या खाद्यतेलाची विक्री बंद

खान्देशदूत by खान्देशदूत
June 10, 2026
in जळगाव जिल्हा
1
धरणगावात ‘तुकाराम मुंढे’ इफेक्ट ; भेसळ माफिया आणि बालकामगार ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले !
0
SHARES
195
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – नियम मोडायचे आणि प्रशासनाला गुंडाळून ठेवायचे, हा धंदा आता धरणगावात चालणार नाही, असा कडक इशारा देत प्रशासनाने शहरात आपला ‘अंमल’ दाखवण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा भार कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्विकारल्या पासून राज्यात धडक कारवाई सुरू आहे. याचाच इफेक्ट सध्या धरणगाव शहर आणि तालुक्यात दिसत आहे. एकीकडे अन्न व भेसळ प्रशासनाने जनसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळ माफियांची नाकेबंदी केली आहे, तर दुसरीकडे धरणगाव पोलिसांनी हॉटेल आणि धाब्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत बालकामगार शोध मोहीम राबवली आहे. प्रशासनाच्या या दुहेरी बडग्यामुळे बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

​भेसळ माफिया भूमिगत; कारवाईच्या भीतीने बाजारपेठेत शुकशुकाट!

​गेल्या दोन दिवसांपासून अन्न व भेसळ प्रशासनाच्या पथकाने शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, दुग्ध व्यावसायिक आणि किराणा दुकानांवर अचानक धाडी टाकण्याचे सत्र सुरू केले आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता, थेट जागेवर जाऊन तपासणी करण्याच्या या ‘मुंढे’ स्टाईल कारवाईमुळे शहरातील भेसळ माफियांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईचा धाक इतका जबरदस्त आहे की, अनेक बड्या आणि लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी कारवाईच्या भीतीने आपली दुकाने चक्क बंद ठेवली आहेत.

सुट्या तेलाच्या काळ्याबाजाराला ब्रेक ; भाववाढ करणाऱ्यांवर नजर

या धडक मोहिमेचा पहिला झटका सुटे तेल विकून नफा कमावणाऱ्या व्यापाऱ्यांना बसला आहे. प्रशासनाच्या भीतीने व्यापाऱ्यांनी सुटे (मोकळे) तेल विकणे तात्काळ बंद केले आहे. यामुळे सर्वसामान्य आणि कष्टकरी जनतेला तेलाचे पाऊच घ्यावे लागत असून आर्थिक फटका बसत आहे. तसेच, शहरातील काही व्यापारी ग्राहकांच्या गरजेचा फायदा घेत तेलाच्या भावात तफावत (मनमानी दर) ठेवत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या असून, आता अशा नफेखोरांवरही प्रशासनाचा डोळा आहे.

​पोलिसांचे ‘ॲक्शन मोड’; हॉटेल आणि धाब्यांवर झाडाझडती !

​लहान मुलांचे बालपण हिरावून त्यांना कामाला जुंपणाऱ्या हॉटेल आणि लॉज मालकांना सरळ करण्यासाठी धरणगाव पोलीस आता पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी कोणतीही हयगय न करता थेट आदेश जारी करून अवघ्या काही तासांत शहरात विशेष पथक तैनात केले.

​या पोलीस पथकाने आज शहरातील हॉटेल्स, हायवेवरील धाबे, लॉजेस, चहाच्या टपऱ्या आणि भंगार बाजारात अचानक एन्ट्री घेत कसून चौकशी सुरू केली. १४ वर्षांखालील एकही बालकामगार आढळल्यास मालकाची खैर नाही, असा सज्जड दमच या पथकाने दिला आहे.

​धडक कारवाई करणारे पोलीस पथक

या पथकाचे प्रमुख म्हणून ​पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे असून हेड कॉन्स्टेबल सत्यवान पवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा गायकवाड, कॉन्स्टेबल गुलाब महाजन, सुमित बाविस्कर यांचा यापथकात समावेश आहे.

धरणगावात सुरू असलेल्या या दणकेबाज कारवाईमुळे कायद्याचा आदर न करणाऱ्या आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. “कायदा पाळा, नाहीतर गाशा गुंडाळा” हाच संदेश या कारवाईतून दिला जात असून, सर्वसामान्य नागरिकांमधून या ‘सिंगम’ स्टाईल मोहिमेचे जोरदार स्वागत होत आहे.

Previous Post

​छत्रपतींचे वारसदारही लाचखोरीचे समर्थक निघाल्याची टिका

Next Post

धान्य वितरणात अनियमितता खपवून घेणार नाही !

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
धान्य वितरणात अनियमितता खपवून घेणार नाही !

धान्य वितरणात अनियमितता खपवून घेणार नाही !

Comments 1

  1. श्याम पाटील says:
    3 months ago

    धरणगावात वृत्तपत्रांमध्ये अजूनही खाद्यपदार्थ देणे चालू आहे उपहार गृह असतील हॉटेल असतील वृत्तपत्रांमध्ये खाद्यपदार्थ देत आहेत

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

September 4, 2026
धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

August 28, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

August 25, 2026
धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

August 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914