धरणगाव, प्रतिनिधी – येथील के.जी.गुजराथी मुकबधिर निवासी विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण उत्साहात संपन्न झाले.
जळगाव येथील सुरेखा ठाकरे यांचे हस्ते राष्ट्रध्वज तिरंग्याचे ध्वजारोहण संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरदचंद्र ठाकरे उपस्थित होते. सर्वप्रथम भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत घेण्यात आले. त्यानंतर तंबाखूमुक्त शाळा व परिसर याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली.
याप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला. सुरेखा ठाकरे, संस्थेचे अध्यक्ष आर.डी.पाटील व संचालक एकनाथ पाटील, व्याख्याते लक्ष्मण पाटील यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी कवायत व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. उत्तम कार्याबद्दल शाळेचे अधिक्षक योगेश पी.पाटील व चतुर्थ श्रेणी कर्मचारी आरिफ शाह, मुख्याध्यापक वाल्मिक पाटील, आर.एच.पाटील व रोहन पवार यांचा सन्मान करण्यात आला. जळगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून ज्या विद्यार्थ्यांनी विशेष यश मिळविले तसेच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्तुंग कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालक मातांसह सर्व महिला – भगिनींचा हळदी कुंकुचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने झाली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष भडांगे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष आर.डी.पाटील, उपाध्यक्ष पुरुषोत्तम साळुंखे, सचिव माया पाटील, संचालक प्रदीप सोनवणे, अरुण पाटील, पिंजारी ताई, सोनवणे सर, जिग्नेश पटेल, शफी शाह, देशमुख दादा, शेख आरिफ व गावातील प्रतिष्ठित मंडळी मुख्याध्यापक वाल्मीक पाटील सर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्ग याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होता.





