• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगाव येथे संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर

जीवब्रम्ह सेवा हाच खरा परमार्थ - बालकनाथजी महाराज

खान्देशदूत by खान्देशदूत
January 26, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगाव येथे संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर
0
SHARES
254
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी – येथे संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज जयंती व वसंत पंचमीच्या पावन पर्वानिमित्त समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळ, लहान माळीवाडा तसेच समस्त नाथभक्त परिवार धरणगाव ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 25) रात्री 9 वाजता लहान माळीवाडा येथे कीर्तन सोहळा भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कीर्तन सोहळ्यात चिंचोळी येथील नवनाथ कथाकार ह.भ.प. गणेश महाराज कुदळे यांनी आपल्या ओघवत्या व प्रभावी कीर्तनातून संत तुकाराम महाराजांचे जीवनकार्य, अभंगगाभा व भक्तीमार्गाचे तत्त्वज्ञान अत्यंत रसाळ शब्दांत उलगडून दाखविले. तत्पूर्वी कीर्तनकार महाराज, बालकनाथजी महाराज व समस्त नाथभक्तांनी संतोष महाजन यांच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर गुरुवर्य बालकनाथ महाराज यांची घोडाबग्गीच्या माध्यमातून सवाद्य मिरवणूक नाथभक्तांच्या प्रचंड उत्साहात संपन्न झाली. भवानी नगर – मरीआई – नवेगाव – लहान माळीवाडा मार्गावरून आलेल्या मिरवणुकीत अनेक महिला भगिनींनी गुरुवर्यांचे औक्षण केले तसेच अनेक नाथभक्तांनी बाबाजींचे आशीर्वाद घेतलेत.

यावेळी नवनाथ संप्रदायावर आधारित भक्तीपर गीते, नामघोष, अभंग व नाथपंथीय पदे सादर करण्यात आली. “नाथा रे नाथा”, “अवधूता अवधूता” यांसारख्या भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर नामस्मरणाने दुमदुमून गेला व उपस्थित भाविक भक्तिरसात तल्लीन झाले. कार्यक्रमाला भजनी मंडळ श्री संतकृपा वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव यांनी सुरेल अभंग – भजनांची साथ दिली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून परमपूज्य गुरुवर्य बालकनाथ महाराज, संस्थापक अध्यक्ष – श्री चैतन्य नवनाथ सिद्ध आश्रम; नवनाथ नगरी, कोळपिंप्री यांची उपस्थिती लाभली. त्यांनी नवनाथभक्ती, संप्रदायाचे सामाजिक व आध्यात्मिक कार्य तसेच कलियुगात नामसाधनेचे महत्त्व यावर मोलाचे मार्गदर्शन केले. जीवब्रम्ह सेवेचे व्रत घेऊन मार्गक्रमण करा म्हणजे खऱ्या अर्थाने अध्यात्माचे कार्य घडेल असे प्रतिपादन बालकनाथजी महाराजांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समस्त कुणबी पाटील समाजाचे खजिनदार लक्ष्मणराव पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन समाजाचे संचालक गणेश पाटील यांनी मानले. याप्रसंगी ह.भ.प.गणेश महाराज कुदळे व परमपूज्य बालकनाथजी महाराज यांचा शाल – श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. या सोबतच ह.भ.प. नाना महाराज, सुभाष नाना कोळपिंप्री, गायनाचार्य नवनाथ महाराज कदम, मृदूंगाचार्य विशाल महाराज नवघरे, विणेकरी ह.भ.प. दिपक महाराज, गायनाचार्य चैताली तोडमल – ज्ञानेश्वरी बेल्हेकर – चांदणी थोरात यांचा देखील शाल – श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन समस्त कुणबी पाटील समाज अध्यक्ष व पंच मंडळ तसेच समस्त नाथभक्त परिवार धरणगाव ग्रुप यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तुकोबांची जयंती व वसंत पंचमीच्या निमित्ताने आयोजित अलौकिक कीर्तन सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, भक्तिभावपूर्ण व अध्यात्मिक वातावरणात पार पडून उपस्थित भाविकांच्या मनावर अविट छाप उमटवून गेला. कार्यक्रमाला गावातील व परिसरातील नाथभक्त महिला – पुरुष – अबालवृद्ध तसेच बालगोपाल यांची लक्षणीय उपस्थिती होती. कीर्तन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समस्त कुणबी पाटील समाज अध्यक्ष व पंच मंडळ तसेच समस्त नाथभक्त परिवार धरणगाव ग्रुप यांनी मोलाचे सहकार्य केले.

Previous Post

महात्मा फुले हायस्कूल येथे गुरु तेग बहादूरजी यांच्या स्मृतींना अभिवादन !

Next Post

पी.डी.पाटील यांना उत्कृष्ट बीएलओ पुरस्कार !

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
पी.डी.पाटील यांना उत्कृष्ट बीएलओ पुरस्कार !

पी.डी.पाटील यांना उत्कृष्ट बीएलओ पुरस्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ पकडले

जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ पकडले

April 13, 2026
स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

April 13, 2026
कुमार थिएटर म्हणजे  धरणगावचे   हृदयच !

कुमार थिएटर म्हणजे धरणगावचे हृदयच !

April 13, 2026
इस्लामाबाद शांतता चर्चा फेल !

इस्लामाबाद शांतता चर्चा फेल !

April 12, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914