• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home ब्रेकिंग

महाराष्ट्रातील विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या कार्यक्रमाला मुदतवाढ

अंतिम मतदार यादी आता २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार !

खान्देशदूत by खान्देशदूत
August 4, 2026
in ब्रेकिंग
0
महाराष्ट्रातील विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या कार्यक्रमाला मुदतवाढ
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाला मुदतवाढ देत सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या विनंतीनंतर आयोगाने हा निर्णय घेतला असून, त्यासंदर्भातील आदेश ४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.

आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार, बीएलओंकडून घरोघरी भेटी घेण्याचा कालावधी आता १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानंतर मतदान केंद्रांचे पुनर्गठन १७ ऑगस्ट रोजी करण्यात येईल. मतदार यादीचा मसुदा २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे.

मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्राप्त दावे व हरकतींची सुनावणी आणि निकाली काढण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यानंतर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

आयोगाने राज्यातील संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व राजकीय पक्षांना सुधारित वेळापत्रकाची माहिती तातडीने देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या बदललेल्या कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी सर्व माध्यमांतून करण्याच्याही सूचना आदेशात करण्यात आल्या आहेत.

Previous Post

धरणगावात पितृऋणाची अनोखी परतफेड !

Next Post

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला अखेर हिरवा कंदिल

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला अखेर हिरवा कंदिल

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला अखेर हिरवा कंदिल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

September 4, 2026
धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

August 28, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

August 25, 2026
धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

August 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914