धरणगाव प्रतिनिधी – शहरातील लहान माळी वाडा परिसरातील समस्त कुणबी पाटील समाज अध्यक्ष व पंच मंडळाच्या वतीने जगद्गुरू तुकोबाराय यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जगद्गुरू तुकोबाराय यांच्या जयंतीचे औचित्य साधून समस्त कुणबी पाटील समाज अध्यक्ष व पंच मंडळाच्यावतीने तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी स्वराज्य संकल्पक महाबली शहाजीराजे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहाजी राजेंच्या उदात्त व महान कार्याचे देखील स्मरण करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ पत्रकार कडू महाजन यांच्यासह कुणबी पाटील समाजाचे अध्यक्ष माधवराव पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, सचिव महेश्वर पाटील, माजी अध्यक्ष भिमराज पाटील, खजिनदार लक्ष्मणराव पाटील, सहसचिव दिनेश पाटील यांच्यासह जेष्ठ संचालक चुडामण पाटील, कैलास पाटील, राजेंद्र पाटील, मोहन पाटील, गणेश पाटील, वाल्मिक पाटील, आनंद पाटील, परशुराम पाटील तसेच समाजाचे सदस्य मुरलीधर पाटील, बाळू पाटील, किशोर (बालू) पाटील, गणेश पाटील, महेंद्र पाटील, संजय पाटील, ज्ञानेश्वर (नाना) पाटील, अशोक पाटील यांच्यासह संत तुकाराम महाराज बीज उत्सव समितीचे पंकज पाटील, गोपाल पाटील, शिपाई गणेश निकम आदी मान्यवर उपस्थित होते.





