धरणगाव, प्रतिनिधी – येथील संताजी तिळवण तेली पंच मंडळ सुभाष दरवाजा विभागाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक एकनाथ शेनपडू चौधरी यांचे कनिष्ठ चिरंजीव कै. बदाम एकनाथ चौधरी (वय ५४) यांचे आज दिनांक १४ जून २०२६, रविवार रोजी राहत्या घरी दुःखद निधन झाले.
बदाम चौधरी अत्यंत मनमिळावू आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने अहिरे परिवार आणि तिळवण तेली समाज बांधवांवर शोककळा पसरली आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सोमवार, दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.
स्व. बदाम चौधरी यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण, पत्नी तसेच भरत आणि अभिषेक ही दोन मुले असा मोठा परिवार आहे.





