धरणगाव, प्रतिनिधी – ‘तरुणाईचा आवाज बनून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या, नव्या विचारांना दिशा देणाऱ्या आणि लाखो युवकांच्या हृदयात आशेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या आदित्य ठाकरे यांचा जीवनप्रवास म्हणजे जिद्द, दूरदृष्टी आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे. राजकारणात एक नवा आदर्श निर्माण करून युवकांना बळ देण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात,’ असे गौरवद्गार शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांनी काढले. शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मुख्य कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना गुलाबराव वाघ बोलत होते.
आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे भाग्यविधाते: निलेश चौधरी
याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे एक झुंजार आणि पर्यावरणवादी नेतृत्व आहे. पक्षाच्या कठीण आणि संकट काळात त्यांनी अत्यंत खंबीरपणे धुरा सांभाळली आहे. ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भाग्यविधाते आहेत.’
रणजित सिकरवार यांचाही वाढदिवस साजरा
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रणजित सिकरवार यांचाही वाढदिवस यावेळी मोठ्या उत्साहात आणि केक कापून साजरा करण्यात आला. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
या जाहीर कार्यक्रमाला शिवसेना आणि युवासेनेचे अनेक प्रमुख नेते व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्यानेमाजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम पाटील,
शिवसेना तालुका प्रमुख जयदीप पाटील,
युवासेना तालुका प्रमुख स्वप्नील परदेशी,
नगरसेवक लक्ष्मण महाजन, भागवत चौधरी, हेमंत महाजन, ज्येष्ठ शिवसैनिक आत्माराम शिरसाठ, किरण अग्निहोत्री, शिवसेना पदाधिकारी लीलाधर पाटील, फिरोज खान, राहुल रोकडे, रियाज बागवान, विनोद रोकडे, रमेश चव्हाण, रणजित सिकरवार, युवा कार्यकर्ते शुभम महाजन, ज्ञानेश्वर महाजन, गजानन महाजन, अरविंद चौधरी यांच्यासह परिसरातील असंख्य शिवसैनिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांमुळे सर्वस्तरातून या कार्यक्रमाचे कौतुक होत आहे.





