• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

चोपडा शहर पोलिसांचे धडक ‘ऑल आऊट ऑपरेशन’

पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या आदेशावरून पो.नि. पवन देसले आणि सहकाऱ्यांची धडक कारवाई

खान्देशदूत by खान्देशदूत
June 8, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
चोपडा शहर पोलिसांचे धडक ‘ऑल आऊट ऑपरेशन’
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी)- गुन्हेगारी नियंत्रण, अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्री.नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) श्री.कोते यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी ५ जून रोजी शहरात अत्यंत प्रभावीपणे ‘ऑल आऊट ऑपरेशन’ (वॉश आऊट मोहीम) राबवली. या धडक मोहिमेमुळे शहरातील अवैध धंदेवाले, गुन्हेगार आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

अवैध धंदे आणि अंमली पदार्थ विरोधी धडक कारवाई

पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने या मोहिमेदरम्यान विविध ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई केली.

देशी दारू व हातभट्टी नष्ट

अवैध देशी दारू विक्री आणि हातभट्ट्यांवर छापे टाकून हातभट्ट्या नष्ट करण्यात आल्या. याप्रकरणी ०७ केसेस नोंदवून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जुगारावर कारवाई

जुगार अड्ड्यांवर कारवाई करत ०४ केसेस दाखल करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

अंमली पदार्थ विरोधी कारवाई

अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारत एनडीपीएस कायद्यांतर्गत ०२ केसेस नोंदवण्यात आल्या आहेत.

संशयितांची धरपकड

रात्री-बेरात्री संशयास्पद रित्या फिरणाऱ्यांची तपासणी करून १२२ बी.पी. ॲक्ट अंतर्गत ०१ केस नोंदवण्यात आली. याशिवाय परिसरातील ०४ धाब्यांची पोलिसांनी कसून तपासणी केली.

नियम मोडणाऱ्या ३० वाहनांवर कारवाई

या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ दरम्यान पोलीस पथकाने शहरातील प्रमुख चौकांमध्ये कडक नाकाबंदी केली होती. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ३० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने खालील कारवायांचा समावेश आहे.

कारवाईचा प्रकार केसेसची संख्या आणि एकूण दंड वसुलीची रक्कम अशी, विना लायसन्स वाहन चालवणे – ५ दंड २,५००, ट्रिपल सीट प्रवास ३ दंड ३,०००, फॅन्सी नंबर प्लेट २ दंड २,०००, रहदारीस अडथळा निर्माण करणे ७ दंड ३,५००, विना नंबर प्लेट वाहन ३,
दंड १,५००, ड्रंक अँड ड्राईव्ह ३ दंड ३०,०००/- (प्रत्येकी १०,००० रु.)

यासह मोव्हिऍक्ट ६६/१९२ अंतर्गत आणि इतर मोटार वाहन कायद्यानुसार केसेस दाखल करण्यात आल्या असून, ३ ट्रॅव्हल्स गाड्यांची देखील सखोल तपासणी करण्यात आली.

प्रतिबंधात्मक कारवाई आणि बेपत्ता महिला सुखरूप परतली!

न्यायालयीन प्रक्रियेला गती देण्यासाठी पोलिसांनी या मोहिमेत एकूण ६ प्रतिबंधात्मक कारवाया केल्या असून ५ वॉरंट बजावले आहेत. या संपूर्ण ऑपरेशन दरम्यान चोपडा शहर पोलिसांनी एक अत्यंत संवेदनशील आणि कौतुकास्पद कामगिरी केली. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा शोध घेण्यास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या पथकाला यश आले असून, महिलेला सुखरूप शोधून काढण्यात आले आहे.
“शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. भविष्यातही अवैध धंदे आणि नियम मोडणाऱ्यांविरुद्ध अशीच कडक कारवाई सुरू राहील,” असा इशारा चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दिला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या योग्य नियोजनामुळे आणि टीमवर्कमुळे ही मोहीम अत्यंत यशस्वी ठरली असून, पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

Previous Post

आनोरे गावात प्रथमच अंधश्रद्धा व कर्मकांडाला फाटा !

Next Post

पोखरी तांडाच्या भूमीत घडणार आध्यात्मिक इतिहास!

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
पोखरी तांडाच्या भूमीत घडणार आध्यात्मिक इतिहास!

पोखरी तांडाच्या भूमीत घडणार आध्यात्मिक इतिहास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

मुलांना औताला जुंपणाऱ्या बापाचे अश्रू पुसत अशोकभाऊंनी सुपूर्द केली बैलजोडी…!

मुलांना औताला जुंपणाऱ्या बापाचे अश्रू पुसत अशोकभाऊंनी सुपूर्द केली बैलजोडी…!

June 18, 2026
धरणगाव नुतन विविध कार्यकारी सोसायटीत महिला राज

धरणगाव नुतन विविध कार्यकारी सोसायटीत महिला राज

June 18, 2026
​महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त ‘समर्पण संस्थे’चा स्तुत्य उपक्रम

​महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त ‘समर्पण संस्थे’चा स्तुत्य उपक्रम

June 18, 2026
‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी

‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी

June 16, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914