• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हरिनाम संकीर्तन सप्ताहाला प्रारंभ !

पाळधीसह खान्देश सज्ज ; महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार लावणार हजेरी

खान्देशदूत by खान्देशदूत
May 26, 2026
in जळगाव जिल्हा
0
ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हरिनाम संकीर्तन सप्ताहाला प्रारंभ !
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) : खान्देशचे लाडके लोकनेते, कार्यसम्राट मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाळधी नगरीत भक्तीचा महाकुंभ भरणार आहे. ना. पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी पाळधी बु. व खुर्द या पावन नगरीत १४ व्या ‘अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह’ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार पासून ३ जून या कालावधीत संपूर्ण पाळधी परिसर विठ्ठल नामाच्या जयघोष आणि भक्ती रसाने न्हाऊन निघणार आहे.

​नेतेपदापलीकडचे ‘माऊली’ रूप

​गुलाबराव पाटील म्हणजे केवळ एक मंत्री किंवा राजकीय नेते नाहीत, तर ते अवघ्या पंचक्रोशीचे आधारवड आहेत. त्यांच्या याच जनसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे सुपुत्र माजी जि.प.सदस्य प्रताप पाटील आणि आयोजक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जी.पी.एस. मित्र परिवार, विठूबाबा युवा मंच, शिवसेना, युवासेना आणि पाळधी गावातील अबालवृद्धांनी या सोहळ्यासाठी अहोरात्र कष्ट उपसले आहेत. हा केवळ एक सोहळा नसून आपल्या लाडक्या नेत्यासाठी जनतेने उभे केलेले हे एक भक्तीचे व्यासपीठ आहे.

​असे असेल भक्तीचे दैनंदिन वेळापत्रक:

​सप्ताहाच्या काळात पाळधीनगरीत पहाटेपासूनच चैतन्य पसरले आहे. मंगळवारी पहाटे ५ ते ६ या वेळेत भावपूर्ण काकडा आरती आणि सायंकाळी ५ ते ६: सामूहिक हरिपाठ चिंतन होणार आहे. ​रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांची सुश्राव्य कीर्तन सेवा होणार आहे.

नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी

२७ मे – ह.भ.प. रामायणाचार्य रामेश्वर महाराज, पाळधीकर, २८ मे ह.भ.प. बालकीर्तनकार ज्ञानेश्वरजी महाराज, जाउरकर, २९ मे ह.भ.प. गुरुवर्य स्वामी अमृतआश्रमजी महाराज जोशी, विडकर, ३० मे ह.भ.प. भागवताचार्य सोनाली दीदी कर्डे, चकलांबेकर (बीड), ३१ मे ह.भ.प. धर्मभूषण संग्रामजी बापू महाराज, भंडारे, आळंदीकर, १ जून ह.भ.प. युवाचार्य संतोषजी महाराज, आढावगे (कुंभारी), २ जून ह.भ.प. कीर्तनकेसरी अंकूरजी महाराज साखरे, गेवराईकर, ३ जून ह.भ.प. गोप्रेमी गजाननजी महाराज वरसाडेकर (काल्याचे कीर्तन व सांगता – सकाळी ८ ते १०

विशेष महाप्रसाद

बुधवार, दि. ३ जून रोजी सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत भव्य महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले असून हजारो भाविक याचा लाभ घेतील.

पंचक्रोशीतील भजनी मंडळांची मांदियाळी

या सोहळ्यात काकडा आरती आणि हरिपाठाचे पवित्र नेतृत्व ह.भ.प. विजू महाराज, नामदेव महाराज, गजानन महाराज यांच्यासह पाळधीतील ज्येष्ठ वारकरी करणार आहेत. याशिवाय चोरगाव, कढोळी, चांदसर, लाडली, रेल, डोनगाव, तहाकळी, पाथराड, धार-शेरी, झुरखेडा यांसारख्या पंचक्रोशीतील तब्बल ३० हून अधिक गावांतील भजनी मंडळे आठवडाभर अखंड सेवा देऊन ना.गुलाबराव पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घालणार आहेत. विणेकरी म्हणून दीपक महाराज (पळसखेडे) तर चोपदार म्हणून संदीप महाराज व रामचंद्र महाराज शेरीकर सेवा बजावतील.

थेट प्रक्षेपण

हा अलौकिक सोहळा जी.पी.एस. स्कूल कॅम्पस, श्रीराम नगर, पाळधी बु. येथे पार पडणार आहे. जे भाविक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत त्यांच्यासाठी ‘मंगेश कीर्तन सेवा’ आणि ‘ज्ञान भक्ती’ या युट्यूब चॅनेल्सवर याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

आवाहन

आपल्या लाडक्या लोकनेत्याच्या कर्तृत्वाला वंदन करण्यासाठी आणि संतांच्या मुखातून पाझरणाऱ्या ज्ञानगंगेचा लाभ घेण्यासाठी पाळधी व जळगाव जिल्ह्यातील सर्व माता-भगिनी, तरुण आणि भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे भावपूर्ण आवाहन आयोजक व समस्त पाळधी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

धरणगाव येथील होमगार्ड सुरेश माळी सेवानिवृत्त

Next Post

​राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला !

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
​राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला !

​राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

September 4, 2026
धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

August 28, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

August 25, 2026
धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

August 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914