• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगाव महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे ‘इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात

​डिजिटल अर्थव्यवस्था आणि भारताचे बदलते चित्र या विषयावर डॉ. मनिषा चौधरी यांचे व्याख्यान

खान्देशदूत by खान्देशदूत
October 17, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगाव महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे ‘इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

​धरणगाव, प्रतिनिधी – येथील प. रा. हायस्कूल सोसायटी संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात गुरूवारी (१५ ऑक्टोबर) अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘इंडक्शन प्रोग्राम’ आणि ‘फ्रेशर्स पार्टी २०२६-२७’ चे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय जगताप हे होते, तर प्रमुख व्याख्यात्या म्हणून जामनेर येथील प्रा.डॉ. मनिषा मनोज चौधरी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. अरुण वळवी उपस्थिती होते.

​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांचे शब्दसुमांनी आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.

​डिजिटल अर्थव्यवस्थेवर सखोल मार्गदर्शन

प्रमुख पाहुण्या डॉ. मनिषा चौधरी यांनी “डिजिटल अर्थव्यवस्था आणि भारताचे बदलते आर्थिक चित्र” या विषयावर अत्यंत सोप्या भाषेत पीपीटी (PPT) सादरीकरण केले. डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे काय?, डिजिटल पेमेंटचे विविध प्रकार व ऑनलाइन बुकिंग पद्धती, ​ऑनलाइन/डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी, डिजिटल अर्थव्यवस्थेचे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे सकारात्मक परिणाम या सर्व मुद्द्यांवर प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केले.

​कलागुणांचे दर्शन आणि फ्रेशर्स पार्टीचा उत्साह

अर्थशास्त्र विभागातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. बौद्धिक सत्रासोबतच विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून मनोरंजनाचा आणि फ्रेशर्स पार्टीचा आनंद लुटला.

​तंत्रज्ञान, संरक्षणशास्त्र अन् अर्थशास्त्राचा संगम

अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. उदय जगताप यांनी विद्यार्थ्यांना ‘अर्थशास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संबंध’ यावर सखोल मार्गदर्शन केले. तर उपप्राचार्य डॉ. अरुण वळवी यांनी ‘संरक्षणशास्त्र आणि अर्थशास्त्र’ या दोन्ही विषयांचा आपापसातील संबंध आणि त्यांचे महत्व यावर प्रकाश टाकला. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजयानंद वारडे यांनी प्रास्ताविक करताना अर्थव्यवस्थेतील तेजी-मंदी आणि दैनंदिन आर्थिक घडामोडींबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.

​उत्कृष्ट नियोजन व संयोजन

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा परिचय सहाय्यक प्राध्यापक डॉ. ज्योती महाजन यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी जागृती चौधरी व अंजली पाटील यांनी केले, उपस्थितांचे आभार प्रा. अर्चना पाटील यांनी मानले.

​या कार्यक्रमाच्या तांत्रिक यशस्वीतेसाठी डॉ. राहुल केदार यांचे सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज वाघारे यांच्यासह अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

धरणगाव रेल्वे स्थानकात ‘आरपीएएफ’ (RPF) आउटपोस्ट सुरू होण्याचा मार्ग सुकर

खान्देशदूत

खान्देशदूत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे ‘इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात

धरणगाव महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे ‘इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात

October 17, 2026
धरणगाव रेल्वे स्थानकात ‘आरपीएएफ’ (RPF) आउटपोस्ट सुरू होण्याचा मार्ग सुकर

धरणगाव रेल्वे स्थानकात ‘आरपीएएफ’ (RPF) आउटपोस्ट सुरू होण्याचा मार्ग सुकर

October 15, 2026
शेतकऱ्यांची बोळवण करणाऱ्या ‘त्या’ ५ हजारात मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करून दाखवावी !

शेतकऱ्यांची बोळवण करणाऱ्या ‘त्या’ ५ हजारात मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करून दाखवावी !

October 15, 2026
दुष्काळग्रस्तांसाठी आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांची २१ हजारांची देणगी

दुष्काळग्रस्तांसाठी आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांची २१ हजारांची देणगी

October 2, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914