धरणगाव, प्रतिनिधी – शहरात शिवरत्न जिवाजी महाले यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. नाभिक समाजासह इतर समाज बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत स्मृतिदिना निमित्त शिवरत्न जिवाजी महाले आणि संत सेना महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा धरणगाव नगरपरिषदेचे गटनेते निलेश चौधरी यांनी जिवाजी महाले यांच्याकडून कर्तबगार वृत्ती व स्वामिनिष्ठा या गुणांची शिकवण घेतली पाहिजे अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी नगरसेवक विलास महाजन, परमेश्वर महाजन, सुनिल चौधरी, पवन महाजन यांच्यासह नाभिक समाजाचे अध्यक्ष अशोक झुंजारराव, जिवाजी सेना तालुकाध्यक्ष रविंद्र निकम, शहराध्यक्ष अमोल महाले, ज्ञानेश्वर झुंजारराव, संजू झुंजारराव, कैलास झुंजारराव, उज्वल महाले, गणेश गायकवाड, सोपान वारुडे, किरण गायकवाड, गणेश झुंजारराव, संजू फुलपगार आदी समाज बांधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र धनगर, जिल्हा युवक कार्याध्यक्ष मोहीत पवार, तालुका उपाध्यक्ष रमेश महाजन, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष खलील खान, शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील, कार्याध्यक्ष रविंद्र वाघ, सचिव नंदू धनगर, युवक शहराध्यक्ष जुनेद बागवान, शहर कार्याध्यक्ष सागर महाले, उपाध्यक्ष समाधान महाजन, साहिल खान यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव व शिवप्रेमी उपस्थित होते.





