• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगाव येथील मरीमाता मंदिराच्या जिर्णोद्धार निमित्ताने महाआरतीसह भंडारा

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

रविंद्र महाजन by रविंद्र महाजन
February 1, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगाव येथील मरीमाता मंदिराच्या जिर्णोद्धार निमित्ताने महाआरतीसह भंडारा
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव – शहराचे ग्रामदैवत श्री मरीआई मंदिराच्या जिर्णोद्धारानिमित्त मरीआई मंदिर संस्थान व जागृती युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य भंडाऱ्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. याप्रसंगी १५ हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण मरीमाता मंदिराचा परिसर भक्तिमय व श्रद्धेच्या वातावरणाने भारावून गेला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला धरणगाव नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा लीलाताई सुरेश चौधरी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई विजय महाजन यांच्यासह नगरसेवक व नगरसेविकांच्या शुभहस्ते विधीवत पूजन व भव्य महाआरती संपन्न झाली. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील सेवेकऱ्यांनी सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठ वाचन करून उपस्थित भाविकांना अध्यात्मिक ऊर्जा प्रदान केली.

यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आला. वरण-भात-पोळी, शिरा व मटकी भाजी असा सात्त्विक व स्वादिष्ट प्रसाद भाविकांना वितरित करण्यात आला. उत्कृष्ट नियोजन, स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध कार्य व सुरळीत व्यवस्थेमुळे महाप्रसाद वितरण शांततेत व अतिशय सुरळीतपणे पार पडले.

या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भगवान महाजन, व्ही.टी.माळी, रामकृष्ण महाजन, सोमनाथ महाजन, शिवाजी देशमुख, माधवराव पाटील, कडू महाजन, राजेंद्र महाजन, पांडुरंग मराठे, दिलीप पाटील, गणेश पाटील, डॉ.रमेश कट्यारे,नगरसेविका कविता पाटील, ज्योती पाटील, भारती महाजन,हेमांगी अग्निहोत्री, प्रमिला शिरसाठ,नगरसेवक विलास महाजन, भागवत चौधरी, विजय महाजन, विनय भावे, परमेश्वर महाजन, सुनिल चौधरी, निलेश चौधरी, कडुसिंग बयस, हेमंत महाजन, किरण अग्निहोत्री यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मरीआई मंदिर संस्थानचे अध्यक्ष किशोर महाजन, उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी जागृती युवक मंडळाचे पदाधिकारी, समस्त माळी समाज, कुणबी पाटील समाज, मराठे समाज, श्री सावता माळी समाज सुधारक मंडळ (मोठा माळीवाडा), तिळवण तेली समाज आदी विविध समाजांचे अध्यक्ष व पंचमंडळ यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.

महाप्रसादासाठी लागणारी सर्व भांडी श्री सावता माळी समाज सुधारणा मंडळ, मोठा माळीवाडा यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमासाठी आवश्यक संपूर्ण पिण्याचे पाणी कृपा ॲक्वा, नमो आदेश ॲक्वा, चव्हाण ॲक्वा व ईश्वर सोनार यांच्या वतीने मोफत पुरवण्यात आले. पाणी वाटपाची सेवा श्री नरेंद्रचार्यजी महाराज भक्त परिवाराने निस्वार्थपणे पार पाडली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.आर.डी.महाजन, लक्ष्मण पाटील व रमेश चौधरी यांनी केले. देणगी स्विकारण्याची जबाबदारी आर.पी.पाटील, गुलाब महाजन, चैत्राम महाजन व संजय पवार यांनी समर्थपणे पार पाडली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मरीआई मंदिर संस्थान, जागृती युवक मंडळ, लहान माळीवाडा मित्र मंडळ, नवेगाव मित्र मंडळ, भगवा ग्रुप, नाथभक्त परिवार, जय भवानी नगर मित्र मंडळ, विविध समाज संघटना, व्यापारी बांधव व दानशूर नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. मंदिर जिर्णोद्धाराच्या उर्वरित कामांसाठी भाविकांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले. तत्पूर्वी भंडाऱ्याच्या आदल्या रात्री श्री.मरीआई माता मंदिरात धार्मिक भजनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. भजन, नामस्मरण व हरिपाठामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले होते. आई मरीमातेच्या कृपेने सर्वांवर सुख, शांती व समृद्धी नांदू दे;अशी सामूहिक प्रार्थना देखील याप्रसंगी करण्यात आली.

Previous Post

धरणगावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Next Post

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा…

रविंद्र महाजन

रविंद्र महाजन

Next Post
नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा…

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

February 10, 2026
धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

February 2, 2026
नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा…

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा…

February 2, 2026
धरणगाव येथील मरीमाता मंदिराच्या जिर्णोद्धार निमित्ताने महाआरतीसह भंडारा

धरणगाव येथील मरीमाता मंदिराच्या जिर्णोद्धार निमित्ताने महाआरतीसह भंडारा

February 1, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914