धरणगाव, प्रतिनिधी – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल मध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.व्ही.आढावे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसिलदार सी.बी.देवराज उपस्थित होते. प्रमुख अतिथींचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील उपशिक्षक पी.डी.पाटील यांनी उपस्थितांसह राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ घेतली. सी.बी.देवराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मतदाराचे अधिकार व राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व श्री.देवराज यांनी सांगून चित्रकला स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शाळेतील बीएलओ एम.बी.मोरे ,पी.डी.पाटील, व्ही.टी.माळी, गोपाल महाजन यांचा नायब तहसिलदार सी.बी.देवराज यांनी पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.डी.पाटील तर आभार एच.डी.माळी यांनी मानले.





