• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home ब्रेकिंग न्यूज

खान्देशच्या सेवेत ‘खान्देशदूत’

संघर्ष नित्याचा, आग्रह सत्याचा...!

रविंद्र महाजन by रविंद्र महाजन
December 27, 2025
in ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग, संपादकीय
0
खान्देशच्या सेवेत ‘खान्देशदूत’
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संघर्ष नित्याचा, आग्रह सत्याचा

खान्देशच्या सेवेत

‘खान्देशदूत

“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””

मित्रांनो, सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, आम्ही T/MH/2025/1006/6062/1349 या क्रमांकाने प्रस्तावित केलेल्या “खान्देशदूत” या साप्ताहिकाला भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागांतर्गत असलेल्या प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया, नवी दिल्ली या संस्थेने अधिकृत नोंदणी क्र . दिला असून लवकरच नव्या वर्षांत “सा. खान्देशदूत” आपल्या सेवेत आणत आहोत. पत्रकारीतेचा ४० वर्षांचा अनुभव आणि महाराष्ट्रातील तमाम दैनिकं, दिवाळी अंकातून केलेले साहित्यिक लेखन या शिदोरीवर स्वतःच्या हातात स्वतःचे आयुध घेवून आम्ही संघर्षासाठी उतरत आहोत. आमच्या लेखणीवर कोणत्याही पक्ष, जाती, धर्माचा रंग नसून केवळ सत्याची पाठराखण आणि निखळ, निर्मळ मनोरंजनाची उधळण एव्हढाच आमचा माफक उद्देश आहे. आम्हाला माहित आहे की, आजच्या काळात सत्याचा आग्रह धरणे म्हणजे पदोपदी संघर्ष करणे. म्हणूनच आम्ही म्हणतोय, “संघर्ष नित्याचा, आग्रह सत्याचा.!” आपण आम्हाला जाणता, ओळखता. आपणही आमच्या या छोट्या प्रवासात सोबती व्हा, सहप्रवासी व्हा. स्नेह अन् मैत्रीची साथ द्या. जेणेकरून आमचा प्रवास सुखकर होवून यशस्वी होण्याची खात्री प्राप्त होईल.

 

मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने माहिती क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. विविध वृत्तवाहिन्या आणि समाज माध्यमांनी बातम्यांचं चोवीस तास दळण मांडलं आहे. असं असलं तरी माध्यमांमध्ये छापील वृत्तपत्रांचे स्थान महत्त्वाचे आहे, कारण ते माहितीचा एक विश्वासार्ह स्रोत आहेत. लिखीत पुरावा आहेत. वाहिन्या स्पर्धेच्या युगात देखण्या आणि आकर्षक होण्याच्या नादात आपली विश्वासार्हता गमावत आहेत. या पार्श्‍वभूमीवर छापील वृत्तपत्र समाजाचा आरसा असून, लोकांच्या दैनंदिन जीवनाचा ते एक अविभाज्य भाग आहेत आणि त्यांचे स्थान माहिती, मनोरंजन आणि सामाजिक जागृतीचे केंद्र म्हणून महत्त्वपूर्ण आहे.

काळाची पाऊलं ओळखत डिजिटल मिडिया आणि दैनिके, साप्ताहिकं यांच्यात समन्वय साधण्याची तारेवरची कसरत संपादकांना करावी लागत आहे. या वाटेवर आम्हीही एक प्रयत्न करुन बघत आहे. चॅनल्स, समाजमाध्यम आणि दैनिकांच्या भाऊगर्दीत साहित्य, कला, संस्कार आणि संस्कृती याला महत्व देत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, विशेषतः स्थानिक बातम्या आणि इतर विविध विषयांवर सखोल माहिती देण्यासाठी आम्ही “सा. खान्देशदूत” च्या माध्यमातून एक पाऊल टाकत आहोत, ज्यामुळे वाचकांना आपल्या खान्देशची आणि जगाची विश्वासार्ह ,चपखल माहिती मिळेल.

जिल्ह्यात अनेक मोठ्या उद्योगसमूहांचे, नामांकित दैनिकं जगण्याचा, टिकून राहण्याचा संघर्ष करत आहेत. या संघर्षांत आम्हीही लेखणी हातात घेवून आग्रेसर आहोतच. लिहत आहोत. व्यक्त होत आहोत. माहिती देत आहोत. प्रबोधन करत आहोत. हे करत असतांना आपल्या विचारांना मुक्त वावर मिळावा, स्वतःचा अवकाश मिळावा आणि खान्देशचं प्रतिबिंब त्यातून ठळक दिसून यावं यासाठी आमचा हा खारीचा वाटा आहे. कुणी याला वेडेपणाही म्हणेल.? आगीत उडी घेण्याचा प्रयत्न म्हणेल. कुणी, यात्रा उठल्यावर दुकान थाटताय अशीही कोपरखळी मारेल. मात्र, आमचा उद्देश स्पर्धा करणं हा नसून, स्वतःला तपासून पाहण्याचा आहे. अंधारात दिवा पटविण्याचा आहे. सर्वत्र आग लागलेली असतांना भित्रेपणाने पळून न जाता, चिमण चोचीतून पाणी आणून आग विझवण्याचा आहे. भलेही याला कुणी वेडेपणा म्हणोत. आम्ही हा बाणेदारपणा समजतो आणि तो निष्ठेने, श्रध्देने, कष्टाने पुढे नेवू याचा विश्वास देतो.

अनेक वर्षांच्या पत्रकारीतेच्या अनुभवांमुळे आणि सत्यान्वेषी परंपरेमुळे आमच्या मनाची एक वैचारीक बैठक तयार झाली आहे. या क्षेत्रातला ४० वर्षांचा निष्पक्ष, निस्वार्थ वावराला सत्यतेच्या निकषांमुळे जनमानसात विश्वासार्हता प्राप्त झाली आहे. त्यामुळेच “संघर्ष नित्याचा, आग्रह सत्याचा” हा घोष करत आम्ही साप्ताहिक “खान्देशदूत” चा प्रारंभ करत आहोत. आपण आमची निष्ठा ओळखतात. आमचा प्रामाणिकपणा जाणतात आणि समर्पणाला मानतात म्हणून आपण आमच्यामागे खंबीरपणे उभे आहात. तीच साथ, तोच विश्वास आम्हाला आज तुमच्याकडून हवा आहे. आम्ही साद देत आहोत, आपण प्रतिसाद द्यालच, ही आशा नव्हे विश्वास आहे.!

साप्ताहिक “खान्देशदूत” स्थानिक समस्या आणि घटनांवर लक्ष केंद्रित करेल. बातम्यांच्या भाऊगर्दीत नेमकी आपली बातमी ठळकपणे समाजासमोर आणेल. ज्यामुळे लोकांचा त्यांच्याशी भावनिक संबंध जोडला जाईल आणि साप्ताहिक “खान्देशदूत” खान्देशचा आवाज बनेल. काळाची पाऊलं ओळखत आम्ही “खान्देशदूत”चा डिजिटल विस्तारही सोबतच करीत आहोत. आता ऑनलाइन पोर्टल, यूट्यूब तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून डिजीटल स्वरूपातही खांन्देशातील बित्तंबातमी क्षणार्धात जगभरातील आपल्या माणसांपर्यंत सहज पोहचविण्यासाठी ‘खान्देशदूत’ सज्ज झाला आहे. आपण आपल्या खान्देशातील समस्या, बातम्या, साहित्य आमच्याकडे पाठवा आम्ही त्यास उचित प्रसिद्धी देवू.!

 

© प्रा.बी.एन.चौधरी.

    (संपादक)

सा. खान्देशदूत. जळगाव.

Next Post

माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन

रविंद्र महाजन

रविंद्र महाजन

Next Post
माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन

माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

February 10, 2026
धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

February 2, 2026
नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा…

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा…

February 2, 2026
धरणगाव येथील मरीमाता मंदिराच्या जिर्णोद्धार निमित्ताने महाआरतीसह भंडारा

धरणगाव येथील मरीमाता मंदिराच्या जिर्णोद्धार निमित्ताने महाआरतीसह भंडारा

February 1, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914