• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खेळासाठी नवे बळ – ना.गुलाबराव पाटील

पालकमंत्री क्रीडांगण विकास योजनेतून 167 जिल्हा परिषद शाळांना 12.14 कोटींचा निधी मंजूर

रविंद्र महाजन by रविंद्र महाजन
January 22, 2026
in जळगाव जिल्हा
0
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खेळासाठी नवे बळ – ना.गुलाबराव पाटील
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, प्रतिनिधी – जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे तसेच खेळासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘पालकमंत्री क्रीडांगण विकास योजना’ राबविण्यात येत असून, या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील एकूण 167 जिल्हा परिषद शाळांसाठी 12 कोटी 14 लाख 40 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये क्रीडासुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचा खेळाकडे ओढा कमी होत होता. परिणामी शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक उत्साह व स्पर्धात्मक वृत्ती यावर परिणाम होत होता. आता या योजनेमुळे विद्यार्थ्यांना नियमित खेळाची संधी मिळून त्यांचा शारीरिक – मानसिक विकास होण्यास चालना मिळणार असून शाळांमध्ये उपस्थिती व पटसंख्या वाढण्यासही मोठी मदत होणार आहे.

यापूर्वी जिल्ह्यात पालकमंत्री वॉल कंपाऊंड योजना यशस्वीपणे राबविण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता शाळांमधील क्रीडासुविधा वाढवण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत 99 शाळांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर 67 शाळांना प्रत्येकी 3 लाख 20 हजार रुपये याप्रमाणे निधी वितरीत करण्यात आला आहे. शाळेतील उपलब्ध जागा, पटसंख्या व आवश्यक कामाचा विचार करून ही आर्थिक तरतूद निश्चित करण्यात आली असून, या शाळांमध्ये क्रीडांगण व पटांगणाचे सपाटीकरण करून कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉलसह 200 मीटर रनिंग ट्रॅक व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात ज्या शाळांमध्ये पुरेशी जागा उपलब्ध आहे तसेच ज्या शाळांची पटसंख्या तुलनेने जास्त आहे, अशा शाळांची निवड शिक्षण विभागाने केली आहे.

तालुकानिहाय मंजूर शाळांची संख्या अशी
अमळनेर – 13, भडगाव – 7, पाचोरा – 14, भुसावळ – 7, पारोळा – 10, मुक्ताईनगर – 10, रावेर – 13, बोदवड – 4, यावल – 10, चाळीसगाव – 17, एरंडोल – 8, चोपडा – 10, धरणगाव – 11, जामनेर – 21, जळगाव – 11

“शाळांमधील शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होणे तितकेच महत्त्वाचे आहे. क्रीडांगण उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण होईल, शाळांमध्ये उपस्थिती वाढेल आणि पटसंख्येलाही चालना मिळेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुलांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या मंजुरीसाठी जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार, आमदार यांचे सहकार्य लाभले असून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविला जाणार आहे.

गुलाबराव पाटील,
पालकमंत्री

————————————

‘पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वार्षिक योजनेतून शाळा विकासासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. ‘पालकमंत्री क्रीडांगण विकास’ योजनेमुळे शाळांचे सर्वांगीण वातावरण सुधारेल. संबंधित यंत्रणांनी कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावीत, यासाठी प्रशासनामार्फत नियमित आढावा घेतला जाणार आहे.’

रोहन घुगे,
जिल्हाधिकारी

————————————

‘167 शाळांसाठी 12.14 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तांत्रिक मंजुरी व कार्यारंभ आदेशाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी ही योजना निश्चितच दिशा देणारी ठरणार आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार क्रीडा सुविधा मिळाव्यात यासाठी गुणवत्तेवर विशेष भर दिला जाणार आहे.
मिनल करनवाल,
मुख्य कार्यकारी अधिकारी

Previous Post

धरणगावात माँसाहेब जिजाऊ महिला पतसंस्थेतर्फे नारी शक्तीचा सन्मान

Next Post

केरळमध्ये पुरूषांचे ‘कार्डबोर्ड बॉक्स’ आंदोलन

रविंद्र महाजन

रविंद्र महाजन

Next Post
केरळमध्ये पुरूषांचे ‘कार्डबोर्ड बॉक्स’ आंदोलन

केरळमध्ये पुरूषांचे 'कार्डबोर्ड बॉक्स' आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

February 10, 2026
धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

February 2, 2026
नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा…

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा…

February 2, 2026
धरणगाव येथील मरीमाता मंदिराच्या जिर्णोद्धार निमित्ताने महाआरतीसह भंडारा

धरणगाव येथील मरीमाता मंदिराच्या जिर्णोद्धार निमित्ताने महाआरतीसह भंडारा

February 1, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914