धरणगाव (प्रतिनिधी): येथील रहिवासी व सध्या भुसावळ येथे वास्तव्यास असलेले तसेच यावल येथे ‘मंडळ अधिकारी’ म्हणून कार्यरत असलेले अतुल यशवंतशेठ बडगुजर (वय ५२) यांचे आज शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात परिवार आणि मोठा आप्तस्वकीय वर्ग आहे.
अतुल बडगुजर हे महसूल विभागात कार्यरत असल्याने त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या निधनाने बडगुजर समाज आणि धरणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज अंत्ययात्रा
त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार, दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता त्यांच्या मूळ गावी धरणगाव येथील ‘बडगुजर गल्ली, धरणी चौक’ येथील निवासस्थानापासून निघणार आहे.





