• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगावात गॅसची कृत्रीम टंचाई : शिवसेना आक्रमक…!

एजन्सी चालकांना घेराव : काळाबाजार आणि वशिलेबाजी बंद करण्याची मागणी

खान्देशदूत by खान्देशदूत
May 6, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगावात गॅसची कृत्रीम टंचाई : शिवसेना आक्रमक…!
0
SHARES
164
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

​धरणगाव, प्रतिनिधी – गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून धरणगाव शहर आणि तालुक्यातील नागरिक गॅस टंचाईमुळे त्रस्त झाले आहेत. गॅस सिलिंडर वितरणात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि काळाबाजार होत असल्याचा आरोप करत आज शिवसेनेच्या वतीने गॅस एजन्सी कार्यालय आणि गोदामावर जोरदार ‘घेराव आंदोलन’ करण्यात आले. शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाची आणि एजन्सी चालकांची चांगलीच पळापळ झाली.

​१,५०० ते २,००० रुपयांना ब्लॅकने सिलिंडरची विक्री!

​धरणगाव शहर व परिसरात गॅस सिलिंडर मिळणे कठीण झाले असून, महिला भगिनींना आणि नागरिकांना तीव्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे. असे असताना दुसरीकडे मात्र १५०० ते २००० रुपयांना गॅस सिलिंडर सर्रासपणे ‘ब्लॅक’ने (काळ्या बाजारात) विकला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. गॅस वितरणात प्रचंड वशिलेबाजी सुरू असून सर्वसामान्यांना डावलले जात असल्याने शिवसैनिकांनी आणि संतप्त नागरिकांनी एजन्सी वितरकांना जागेवरच धारेवर धरले.

​तीन महिन्यांच्या स्टॉकची होणार चौकशी

​या गंभीर प्रकरणाची दखल घेत इंडियन ऑइल कंपनीच्या एरिया मॅनेजरशी तात्काळ संपर्क साधण्यात आला आहे. मागील तीन महिन्यांत एजन्सीकडे आलेला गॅसचा स्टॉक आणि प्रत्यक्षात झालेले वितरण याची सविस्तर माहिती मागवण्यात आली असून, यामध्ये मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​दोषींवर थेट गुन्हे दाखल करणार : पुरवठा अधिकारी

आंदोलनाची दखल घेत पुरवठा अधिकारी श्रीमती कांबळे आणि श्री. मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. “नागरिकांची तक्रार आल्यास आम्ही जनतेला पूर्ण न्याय देऊ. गॅस वितरणात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर थेट गुन्हा दाखल केला जाईल,” असा इशारा पुरवठा अधिकारी श्रीमती कांबळे यांनी दिला आहे.

१५ दिवसांत घरपोच सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन

​शिवसेनेचा आक्रमक अवतार आणि नागरिकांचा रोष पाहून गॅस एजन्सीच्या वितरक श्रीमती मुथा यांनी नमती भूमिका घेतली. “नागरिकांच्या समस्यांवर लवकरच तोडगा काढला जाईल. येत्या १५ दिवसांत घरपोच गॅस वितरण सेवा पूर्णपणे सुरळीत करून नागरिकांना वेळेवर सिलिंडर उपलब्ध करून दिले जातील,” असे आश्वासन त्यांनी लेखी निवेदनाद्वारे दिले.

​शिवसेना आणि युतीचे पदाधिकारी मैदानात

​या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना शहर प्रमुख धीरेंद्र पुरभे यांनी केले. याप्रसंगी बाळू जाधव, सोनु महाजन, मोनु महाजन, रवि कंखरे, नगरसेवक तौसीफ पटेल, बुट्या पाटील, रवि महाजन, शिरीष आप्पा बयस, टोनी महाजन, सद्दामभाई, मॉन्टी चव्हाण, हेमराज चौधरी यांच्यासह शिवसेना आणि महायुतीचे अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘गोरगरिबांचा गॅस अडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही,’ असा इशारा शेवटी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.

Previous Post

आध्यात्मिक आणि आरोग्य दृष्ट्या गोपालन महत्वाचे – डाॅ. मिलिंद डहाळे

Next Post

दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे ‘मनोबल’ राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचे आयोजन

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे ‘मनोबल’ राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचे आयोजन

दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे 'मनोबल' राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

July 18, 2026
धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

July 18, 2026
मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

July 15, 2026
धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

July 15, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914