धरणगाव, प्रतिनिधी – भुसावळ येथील लेखापरीक्षक प्रकाश चौधरी यांचा धरणगावात सत्कार करण्यात आला. आळंदी येथील अधिवेशनात राज्यस्तरीय’ उत्कृष्ट लेखापरीक्षक’पुरस्काराने प्रकाश चौधरी यांना नुकतेच गौरविण्यात आले.
यशवंत अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटीच्या वतीने चेअरमन प्रा.सम्राट परिहार तसेच व्यवस्थापक किरण मराठे, जळगाव येथील सहाय्यक दिलीप सोनार व कर्मचारी यांच्यातर्फे प्रकाश चौधरी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र ऑडिटर्स कौन्सिल ॲण्ड वेल्फेअर असोसिएशनचे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच आळंदी आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात प्रमाणित लेखापरीक्षक राज्यस्तरीय दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत भुसावळ तालुक्यामधील कुऱ्हे पानाचे येथील प्रमाणित लेखापरीक्षक प्रकाश प्रल्हाद चौधरी यांचा राज्यस्तरीय ‘सर्वोत्कृष्ट लेखापरीक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
नुकत्याच पार पडलेल्या या ऐतिहासिक अधिवेशनात महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शेकडो लेखापरीक्षक सहभागी झाले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय लेखापारीक्षकांचे अधिवेशन संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या भव्य स्मृतीचिन्ह देऊन प्रकाश चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. हा सन्मान माझा एकट्याचा नसून जळगाव जिल्ह्यातील सहकारी संस्था आणि जिल्ह्यातील सर्व लेखापरीक्षकांचा असल्याची भावना व्यक्त करून या पुरस्कारामुळे मला भविष्यात आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल अशी भावना प्रकाश चौधरी यांनी व्यक्त केली. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष रामदास शिर्के यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. पी.पी.चौधरी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जळगाव जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
यशवंत अर्बन को ऑप.क्रेडीट संस्थेने केलेला सत्कार विशेष असून आपल्या माणसांनी केलेलं कौतुक ऊर्जादायी असल्याचे सांगून संस्थेचे चेअरमन प्रा. सम्राट परिहार, व्हाईस चेअरमन सी.के. पाटील यांसह सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाचे प्रकाश चौधरी यांनी आभार मानले.





