धरणगाव, प्रतिनिधी – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे राष्ट्रसंत जगद्गुरु तुकोबाराय, नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करण्यात आली.
प्रास्ताविक व्ही.टी.माळीसर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार होते. मान्यवरांच्या हस्ते जगद्गुरु तुकोबाराय, नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. पी.डी.पाटील यांनी जगद्गुरु तुकोबाराय यांचे जीवन कार्य उलगडले. जी.पी.महाजन यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे कार्य सांगितले, एस.व्ही.आढावे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपटाची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पी.डी.पाटील तर आभार एच.डी.माळी यांनी मानले.





