• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

केरळमध्ये पुरूषांचे ‘कार्डबोर्ड बॉक्स’ आंदोलन

तरूणी कडून चुकीचे आरोप : तरूणाची आत्महत्या

खान्देशदूत by खान्देशदूत
January 22, 2026
in राष्ट्रीय
0
केरळमध्ये पुरूषांचे ‘कार्डबोर्ड बॉक्स’ आंदोलन
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोझिकोड, वृत्तसंस्था – केरळमध्ये एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर महिलेने बस प्रवासादरम्यान झालेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर केला, सार्वजनिक बसमधून प्रवास करतांना एका सह प्रवासी या महिलेला चुकीचा स्पर्श करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्यक्तीला ट्रोल करण्यात आले. समाजात बदनामी होत असल्याने या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेतंर संपूर्ण केरळ राज्यात पुरूषांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी या कृत्याचा निषेधार्थ ‘कार्डबोर्ड बॉक्स’ आंदोलन सुरू केले आहे.

महिलेने व्हायरल केलेला व्हिडिओ आणि कुटुंबाच्या दाव्यांनंतर, पोलिस शिमजिता मुस्तफा नावाच्या या महिलेविरुद्ध कायद्यानुसार कारवाई सुरू केली आहे. ही महिला सध्या पोलिसांच्या हाती लागलेली नसून फरार असल्याचे समजते. बहुसंख्य लोकांना या महिलेच्या आरोपांमध्ये खोटेपणा असू शकतो आणि त्यामागे आर्थिक लाभ घेण्याचा उद्देश असावा असे वाटत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करण्यासाठी राज्य मानवाधिकार आयोगाने स्वतंत्र निर्देश जारी केले आहेत. या घटनेने सोशल मीडियावरून न्याय मागण्याच्या पद्धतींवर नवीन चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणाची सुरुवात गर्दी असलेल्या बस प्रवासापासून झाली. शिमजिता मुस्तफा ही महिला बसने प्रवास करत असताना, तिने दिपक नावाच्या एका पुरुषाने आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श केल्याचा दावा केला. तिने याचा २९ सेकंदांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो इंटरनेटवर अपलोड केला. व्हिडिओमध्ये दीपकचा कोपर महिलेच्या संवेदनशील भागाला लागत असल्याचे दाखवले गेले आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटवल्या ज्यात अनेकांनी दीपकवर टीका केली आणि त्याला ट्रोल करण्यात आले. दीपकच्या कुटुंबीयांच्या मते, हे ट्रोलिंग आणि सार्वजनिक अपमान इतके तीव्र होते की त्याने दीपकला जीवन संपवण्याच्या निर्णयापर्यंत नेले. कुटुंबाने सांगितले की, व्हिडिओ व्हायरल होण्याच्या काही तासांनंतरच दीपकने हे पाऊल उचलले. पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खेळासाठी नवे बळ – ना.गुलाबराव पाटील

Next Post

मोफा कायदा रद्द करण्यासाठीची प्रलंबित याचिका फेटाळली

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
मोफा कायदा रद्द करण्यासाठीची प्रलंबित याचिका फेटाळली

मोफा कायदा रद्द करण्यासाठीची प्रलंबित याचिका फेटाळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

July 18, 2026
धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

July 18, 2026
मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

July 15, 2026
धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

July 15, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914