• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home धुळे-नंदुरबार

धुळे शहरात ‘गोपाला गोपला देवकी नंदन गोपाला’ चा गजर…!

राष्ट्रसंत गाडगेबाबांची जयंती उत्साहात साजरी

रविंद्र महाजन by रविंद्र महाजन
January 21, 2026
in धुळे-नंदुरबार
0
धुळे शहरात ‘गोपाला गोपला देवकी नंदन गोपाला’ चा गजर…!
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धुळे, प्रतिनिधी – महाराष्ट्र ही संतांची पुण्यभूमी आहे. अशा या पुण्यभूमीत अनेक संत-महात्मे होऊन गेले. त्यातीलच एक महान संत म्हणजे राष्ट्रसंत गाडगेबाबा. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व सांस्कृतिक कार्य विभागचे सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाच्यावतीने हिरे भवन येथे ‘कर्मयोगी गाडगेबाबा’ या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघाचे मुख्य समन्वयक ऍड.एन.एस.पाटील यांच्या हस्ते गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी व वक्त्या डॉ. प्रा. रजंनी मुगंसे, निवृत न्यायधिश जे.टी.देसले, अतुल निकम, जिल्हा क्रीडा अधिकारी एम.के. पाटील, शाहीर परिषदेचे आप्पा खताळ, तमाशा परिषदेचे अध्यक्ष शेषराव गोपाळ, धुळे जिल्हा कलावंत विकास मंचचे जिल्हाध्यक्ष सुरेश चत्रे ,जेष्ठ नागरीक संघांचे उपाध्यक्ष अरविंद पाखले, एन.पी.वाणी, परिट धोबी समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष कृष्णा शिंदे, दिलीप गवळी, परदेशी धोबी संघटनेचे अध्यक्ष गणेश परदेशी, संत गाडगेबाबा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अमोल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक विनोद ढगे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत जेष्ठ संयोजक विजय मंगळे यांनी केले. या कार्यक्रमात महाराष्ट्रतील प्रसिद्ध युवा भारूडकार हम्मीद सय्यद (अहिल्यानगर) यांचा भारूडाचा कार्यक्रम व अमरावती येथील प्रसिद्ध प्रबोधनकार व सप्तखंजीरी वादक पवन महाराज दवंडे यांचा प्रबोधनात्मक असा ‘कर्मयोगी’ गाडगे महाराज या सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाला धुळेकरांच्या उदंड प्रतिसाद मिळाला. ‘गोपाला गोपला, देवकी नंदन गोपाला’च्या गजरात संपूर्ण हिरे भवन भारूडाच्या रंगी रंगुन गेले.

कार्यक्रम प्रसंगी धुळ्यातील जेष्ठ नागरिक संघ,परिट धोबी महासंघ, अखिल भारतीय शाहीर परिषद, अखिल भारतीय नाट्य परिषद, खान्देश तमाशा परिषद, बालरंगभूमी परिषद, धुळे ऑर्केस्ट्रा कलाकार संघ आदी विविध संस्थांचे कलावंत, लोककलावंत मोठ्या संस्थेने उपस्थित होते. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सह समन्वयक सिंध्दांत मगळे, मोहीत पाटील, सचिन महाजन, राहूल मंडळे, अरविंद पाटील, राजू गवळी, दिलीप हजारे, जगदीश सगरे, गणेश सगरे, खजिनदार संजय गवळी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

धरणगाव महाविद्यालयात २१ जानेवारीला एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन

Next Post

धरणगाव – पुणे बस पुर्ववत सुरू करा !

रविंद्र महाजन

रविंद्र महाजन

Next Post
धरणगाव – पुणे बस पुर्ववत सुरू करा !

धरणगाव - पुणे बस पुर्ववत सुरू करा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

February 10, 2026
धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

February 2, 2026
नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा…

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा…

February 2, 2026
धरणगाव येथील मरीमाता मंदिराच्या जिर्णोद्धार निमित्ताने महाआरतीसह भंडारा

धरणगाव येथील मरीमाता मंदिराच्या जिर्णोद्धार निमित्ताने महाआरतीसह भंडारा

February 1, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914