धरणगाव, प्रतिनिधी – नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुरेखाताई विजय महाजन यांची बिनविरोध निवड झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सौ.महाजन यांच्या नावाची घोषणा केली होती. लोकनियुक्त नगराध्यक्षा लिलाताई चौधरी, गटनेते निलेश चौधरी यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे पालकमंत्री गुलाबरावांनी दिलेल्या उमेदवाराविरूध्द आपला उमेदवार दिला नाही. यानिमित्ताने धरणगावात पुन्हा एकदा राजकीय एकजुटीचे दर्शन घडून आले. स्विकृत सदस्यपदी शिवसेनेचे माजी गटनेते पप्पू भावे आणि शिवसेना उबाठाचे शहरप्रमुख भागवत चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.
धरणगाव नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची विशेष सभा आज मंगळवारी (दि. 13) आयोजित करण्यात आली. पालिकेत शिवसेना-भाजपा महायुतीच्या जनविकास आघाडीचे १५ आणि उबाठा-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे आठ नगरसेवकांसह लोकनियुक्त नगराध्यक्षपदी लिलाताई चौधरी विजयी झाल्या आहेत. उबाठाकडे सत्ता असली तरी बहुमत शिंदे सेनेकडे असल्यामुळे आजच्या या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शहरात बहुसंख्य असलेल्या माळी समाजाला उपनगराध्यक्षपदी संधी देण्याचा निर्णय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या बैठकीत जाहीर केला. यानंतर सुरेखाताई विजय महाजन यांच्या नावाची घोषणा ना.पाटील यांनी केली. आज सुरेखाताईंनी उमेदवारी अर्ज दाखल. शविआचे गटनेते निलेश चौधरी यांनी आधीच ना.गुलाबराव पाटील देतील त्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले होते. परिणामी आज सुरेखा महाजन यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. नगरसेवकांच्या संख्याबळानुसार दोन्ही आघाडींच्या वाट्याला प्रत्येकी एक स्विकृत नगरसेवक आले. शिंदे सेनेकडून अनुभवी पप्पू भावे तर उबाठा कडून शहरप्रमुख भागवत चौधरी यांना संधी मिळाली.
उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेना आणि भाजप यांना प्रत्येकी अडीच वर्ष विभागून देण्यात आल. पहिले एक वर्ष शिवसेना नंतर अडीच वर्ष भाजपा व शेवटची दिड वर्ष पुन्हा शिवसेनेला असा फाॅम्यूला निश्चित झाला असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ता पी.एम.पाटील यांनी समाजमाध्यमांवर दिली. उपनगराध्यक्षा सुरेखा विजय महाजन यांना लोकनियुक्त नगराध्यक्षा लीलाताई चौधरी यांनी पदभार दिला. निवडणूक संपली आता विकासासाठी आम्ही सर्व एक आहोत असे नगराध्यक्षा विद्याताई यांनी सर्व पक्षाच्या पदाधिकारी व नगरसेवकांसमोर सांगितले. विजयी पदाधिकाऱ्यांचे लोकनियुक्त लीलाताई चौधरी, गटनेते निलेश चौधरी आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या दालनात जाऊन सत्कार केला. जळगाव जिल्हा शिवसेना प्रवक्ते माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव चौधरी, एडवोकेट शरद माळी, भाजपाचे पुनीलाल महाजन, राष्ट्रीय चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, तालुकाप्रमुख डी.ओ.पाटील, भाजपाचे जिल्हा मीडिया प्रमुख महाजन टोनी, ज्येष्ठ पत्रकार भरतभाऊ चौधरी, सुदर्शन चौधरी, महायुतीचे गटनेते विलास महाजन, माळी समाजाचे अध्यक्ष व्ही.टी.माळीसर, उपाध्यक्ष सोमनाथभाऊ महाजन, सचिव आर.डी.माळीसर, रामकृष्ण महाजन, समाजाचे सर्व संचालकांसह महिला व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना शहरप्रमुख धीरेंद्र पूरभे, पप्पू कंखरे, कल्पेश विसावे, भूषण कंखरे, पापा वाघरे, उद्योगपती वाल्मीक पाटील, सोनू महाजन, विकासोचे चेअरमन रामकृष्ण महाजन, प्रशांत देशमुख, किरण महाजन, विनायक महाजन, करण वाघरे, रवींद्र जाधव कमलेश बोरसे, नंदकिशोर पाटील, दीक्षा गायकवाड, हेमंत चौधरी, भारतीताई चौधरी, प्रमिलाताई रोकडे, सुनीता पाटील, युवा सेनेचे संतोषभाऊ महाजन, विशाल महाजन, अविनाश महाजन, नितीन पाटील, भानुदास पाटील, बबलू महाजन, संजय महाजन, चेतन पाटील, भूषण पाटील, सोनू पटेल यांच्यासह सर्वच पक्षांचे हजारो कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
अनुभवी पदाधिकाऱ्यांमुळे
विकासाचा वेग कायम राहणार!
ना.गुलाबराव पाटील
धरणगाव पालिकेच्या उपनगराध्यक्ष आणि स्विकृत नगरसेवकाची निवड करतांना अनुभवाला प्राधान्य देण्यात आले. सुरेखाताई महाजन यांनी आधी सुध्दा उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. उपनगराध्यक्षाकडेच पाणीपुरवठा समितीचे सभापतीपद असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा लाभ सुरळीत ठेवण्यासाठी होईल. यंदा पालिकेत बहुसंख्य नगरसेवक तरूण असल्याने स्विकृत नगरसेवक नियुक्त करतांना अनुभवी पप्पू भावे यांना संधी दिली. शविआने सुध्दा निवडणूक बिनविरोध करून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची मानसिकता सिध्द केल्यामुळे समन्वयातून शहराचा विकास करण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.





