• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगाव रेल्वे स्थानकात ‘आरपीएएफ’ (RPF) आउटपोस्ट सुरू होण्याचा मार्ग सुकर

पश्चिम रेल्वेचे महानिरीक्षक अजय सादानी यांच्याकडे प्रतीक जैन यांचा यशस्वी पाठपुरावा

खान्देशदूत by खान्देशदूत
October 15, 2026
in जळगाव जिल्हा, धुळे-नंदुरबार
0
धरणगाव रेल्वे स्थानकात ‘आरपीएएफ’ (RPF) आउटपोस्ट सुरू होण्याचा मार्ग सुकर
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आणि वर्दळीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धरणगाव रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. वाढती रहदारी, रेल्वे प्रवाशांची सुरक्षा, चोरी आणि अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी धरणगाव येथे ‘रेल्वे सुरक्षा बल’ (RPF) चे स्वतंत्र आउटपोस्ट सुरू करणे अत्यंत गरजेचे बनले होते. हीच जनहितार्थ आणि अत्यंत महत्त्वाची मागणी पश्चिम रेल्वेचे महानिरीक्षक तथा प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अजय सादानी यांच्या दरबारी यशस्वीरीत्या मांडण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई येथील मुख्यालयात झोनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीचे सदस्य तथा धरणगावचे तरुण आणि जनमानसात लोकप्रिय असलेले युवा नेते प्रतिक जैन यांनी ही भेट घेत या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा केली. त्यांच्या या धडाडीच्या आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे धरणगाव रेल्वे स्थानकात आरपीएफ आऊटपोस्ट सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका

धरणगाव रेल्वे स्थानकातून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या गाड्या असोत किंवा पॅसेंजर गाड्या, प्रवाशांची सतत ये-जा सुरू असते. मात्र, रेल्वे स्थानक आणि फलाटांवर सुरक्षा यंत्रणेचा अभाव असल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच ऐरणीवर राहिला आहे. या सर्व गोष्टींची गांभीर्याने दखल घेत ZRUCC मेंबर प्रतिक जैन यांनी सातत्याने या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. याच मालिकेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून त्यांनी मुंबई येथे जाऊन पश्चिम रेल्वेचे महानिरीक्षक तथा प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अजय सादानी यांची प्रत्यक्ष भेट घेतली.

या उच्चस्तरीय भेटीदरम्यान प्रतीक जैन यांनी धरणगाव रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची वाढती संख्या, परिसराची भौगोलिक रचना आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या अडचणींचा सविस्तर पाढा वाचला. त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा मांडला की, धरणगाव हे केवळ प्रवाशांच्या दृष्टीनेच नव्हे, तर व्यापारी दृष्टिकोनातूनही एक महत्त्वाचे केंद्र आहे. अशा ठिकाणी रात्री-अपरात्री येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे सुरक्षा बळाची (RPF) उपस्थिती असणे ही काळाची गरज आहे.

महानिरीक्षक अजय सादानी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद

ZRUCC मेंबर प्रतीक जैन यांनी मांडलेला हा अत्यंत संयुक्तिक आणि जनहिताचा विषय पश्चिम रेल्वेचे महानिरीक्षक अजय सादानी यांनी अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतला. प्रवाशांची सुरक्षा ही रेल्वे प्रशासनासाठी सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत, श्री. सादानी यांनी धरणगाव रेल्वे स्थानकावर RPF आउटपोस्ट सुरू करण्याच्या प्रस्तावावर तातडीने आणि अनुकूल कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांच्या या सकारात्मक प्रतिसादांमुळे धरणगाववासीयांच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित मागणीला न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रतीक जैन:जनतेच्या प्रश्नांवर सदैव तत्पर असणारे अभ्यासू नेतृत्व

या संपूर्ण घडामोडीनंतर धरणगाव शहर आणि परिसरात ZRUCC मेंबर प्रतिक जैन यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. पदावर केवळ मिरवून न घेता, जनतेच्या अडीअडचणींना थेट उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्या सोडवून घेण्यात प्रतीक जैन यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न हाती घेऊन तो थेट पश्चिम रेल्वेच्या महानिरीक्षकांपर्यंत नेण्याचे कसब केवळ एका अभ्यासू आणि प्रवाशांच्या हिताची तळमळ असलेल्या प्रतिनिधी कडेच असू शकते, अशा शब्दांत धरणगावमधील नागरिक, व्यापारी वर्ग आणि रेल्वे प्रवासी संघटनांनी प्रतीक जैन यांच्या विषयी भावना व्यक्त केल्या आहेत. प्रतिक जैन यांच्या पाठपुराव्यामुळे धरणगाव रेल्वे स्थानकाचा कायापालट होण्यास मदत होत असून, प्रवाशांना एक निर्भय आणि सुरक्षित प्रवास अनुभवता येणार आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

धरणगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफ आऊटपोस्ट सुरू झाल्यास कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या निर्णयामुळे गैरप्रकारांना आळा बसेल आणि महिला भगिनींना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल. प्रतीक जैन यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक प्रश्न मार्गी लागण्याच्या मार्गावर असल्याबद्दल संपूर्ण धरणगाव तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

शेतकऱ्यांची बोळवण करणाऱ्या ‘त्या’ ५ हजारात मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करून दाखवावी !

Next Post

धरणगाव महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे ‘इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
धरणगाव महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे ‘इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात

धरणगाव महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे ‘इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे ‘इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात

धरणगाव महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे ‘इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात

October 17, 2026
धरणगाव रेल्वे स्थानकात ‘आरपीएएफ’ (RPF) आउटपोस्ट सुरू होण्याचा मार्ग सुकर

धरणगाव रेल्वे स्थानकात ‘आरपीएएफ’ (RPF) आउटपोस्ट सुरू होण्याचा मार्ग सुकर

October 15, 2026
शेतकऱ्यांची बोळवण करणाऱ्या ‘त्या’ ५ हजारात मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करून दाखवावी !

शेतकऱ्यांची बोळवण करणाऱ्या ‘त्या’ ५ हजारात मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करून दाखवावी !

October 15, 2026
दुष्काळग्रस्तांसाठी आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांची २१ हजारांची देणगी

दुष्काळग्रस्तांसाठी आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांची २१ हजारांची देणगी

October 2, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914