धरणगाव (प्रतिनिधी) – तालुका मुद्रांक विक्रेता (स्टॅम्प वेंडर) संघटनेची विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत संघटनेच्या नवीन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली असून, तालुकाध्यक्षपदी प्रमोद मार्तंडराव साळुंखे (चांदसर) तर उपाध्यक्षपदी सुनील रमेश बडगुजर (धरणगाव) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
मुद्रांक विक्रेते संघटनेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. संघटनेचे कार्य अधिक मजबूत करण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. या नवीन कार्यकारणीत सचिवपदी संजय पुंडलिक पाटील आणि खजिनदारपदी नितीन शांताराम पाटील यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
निवडीची घोषणा होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. बैठकीला उपस्थित जिल्हा पदाधिकारी व तालुका मुद्रांक विक्रेते बांधवांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
प्रमुख उपस्थिती
या बैठकीला धरणगाव शहर व तालुक्यातील काशिनाथ मराठे, मांगो मोरे, राजेंद्र मोरे, नितीनचंद्र बन्सी, विलास पवार, रवि महाजन, अनिल पाटील, रोहिदास सोनवणे, अंकुश चव्हाण, दत्तात्रय चौधरी, गौतम सपकाळे, अनिल महाजन, शेख इक्बाल, अनिल चौधरी, विक्रमसिंग पाटील यांसह अनेक मुद्रांक विक्रेते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद साळुंखे व उपाध्यक्ष सुनील बडगुजर यांनी सर्व सभासदांचे आभार मानत, तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांच्या न्याय्य हक्कांसाठी व अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास व्यक्त केला.





