धरणगाव, प्रतिनिधी – येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी संजय भिमराव तोडे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०२५ चा विद्यापीठ स्तरीय ‘उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी सेवा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि कबचौ उमविचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते संजय तोडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यापीठ स्तरावरील या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे संजय तोडे यांच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी व्यासपीठावर विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्र-कुलगुरू डॉ. सोपान इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन समिती सदस्य प्रा. डी.आर.पाटील, डॉ. राजेंद्र नन्नवरे, व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. कांचन महाजन, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. ऋषिकेश चित्तम यांच्यासह विद्यापीठातील पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वस्तरातून कौतुक आणि सत्कार
विद्यापीठ स्तरावरील हा महत्त्वपूर्ण पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय तोडे यांचा विविध संस्था व मान्यवरांच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प. रा. हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजय शेट पगारिया. प्रा.आर.एन.महाजन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय जगताप, उपप्राचार्य डॉ.ए.डी.वळवी, डॉ.के.एम.पाटील, प्रा.सी.एस.पाटील, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.प्रवीण बोरसे, प्रा.एम.यू.पाटील, प.रा.हायस्कूलचे मुख्याध्यापक डी.एस.पाटील, प्रा.बी.एन.चौधरी, डॉ.संजीवकुमार सोनवणे. चोपडा येथील पंकज महाविद्यालय प्राचार्य डॉ.किशोर सोनवणे, मराठी विभाग प्रमुख डॉ.मधुचंद्र भुसारे, उपप्राचार्य डॉ.सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.वाघ आणि डॉ.मंगेश पाटील, जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे आस्थापना अधिकारी बाबूलाल शिरसाठ व छगन अंभोरे यांसह धरणगाव महाविद्यालयांतील सर्व आजी-माजी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संजय तोडे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





