• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home सामाजिक

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

नगरसेवक लक्ष्मण माळी यांच्या उपस्थितीत स्मारक पूजन

खान्देशदूत by खान्देशदूत
July 18, 2026
in सामाजिक
0
​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – आपल्या लेखणीतून आणि खणखणीत शाहिरीतून शोषित, उपेक्षितांचा आक्रोश जगासमोर मांडणारे थोर समाजसेवक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त धरणगाव येथे त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. येथील ‘मोठा माळी वाडा’ परिसरातील मातंग समाजाच्या वस्तीत असलेल्या अण्णाभाऊंच्या स्मारकाजवळ हा अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

​याप्रसंगी नगरसेवक लक्ष्मण माळी यांनी समस्त समाजबांधवांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्मारकाचे मुख्य पूजन माळी समाजाचे माजी सचिव दशरथ महाजन व माळी समाजाचे ज्येष्ठ पंच रावा महाजन यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झाले. यावेळी उपस्थितांनी अण्णाभाऊंच्या सामाजिक आणि साहित्यिक योगदानाचा गौरव केला.

​या अभिवादन सोहळ्याला परिसर व माळी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने कैलास महाजन, फकीरा जाधव, राजू जाधव, विजय जाधव, गजानन महाजन, आकाश महाजन, किशोर जाधव, कांतीलाल महाजन, भागवत महाजन, कैलास काका आणि प्रवीणभाऊ यांच्यासह बहुसंख्य समाजबांधवांची लक्षणीय उपस्थिती होती. संपूर्ण परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना उजाळा देत आदरांजली वाहण्यात आली.

Previous Post

धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

Next Post

ग्रामपंचायत मतदार यादीचा कार्यक्रम स्थगित

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
ग्रामपंचायत मतदार यादीचा कार्यक्रम स्थगित

ग्रामपंचायत मतदार यादीचा कार्यक्रम स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

September 4, 2026
धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

August 28, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

August 25, 2026
धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

August 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914