• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगावात महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

राजपूताना फाउंडेशन व महाराणा प्रतापसिंह चौफुली समितीचा स्तुत्य उपक्रम : १०३ रक्तदात्यांचा विक्रमी सहभाग

खान्देशदूत by खान्देशदूत
June 29, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगावात महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

​धरणगाव, प्रतिनिधी – क्रांतीसूर्य, हिंदू कुलभूषण, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८६ व्या जयंतीचे औचित्य साधून धरणगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

‘राजपूताना फाउंडेशन’ आणि ‘महाराणा प्रतापसिंह चौफुली समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात परिसरातील सुजाण नागरिकांनी अभूतपूर्व आणि विक्रमी प्रतिसाद नोंदवला. संपूर्ण शिबिरादरम्यान एकूण १०३ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हा संदेश सार्थ ठरवला.

​रविवार, २८ जून रोजी सकाळी ठीक ८:३० वाजता राजपूत समाज मंगल कार्यालय, धरणगाव येथे कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली. प्रारंभी हळदीघाटीच्या पावन मातीचे आणि महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचा पूजन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर सकाळी ८:३० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर सुरू होते. नागरिकांनी व तरुणांनी रक्तदानासाठी केंद्रावर मोठी गर्दी केली होती.

​या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सहभागी झालेल्या सर्व १०३ रक्तदात्यांना संस्थेच्यावतीने सन्मानपूर्वक प्रमाणपत्र आणि ‘हिमस्ट्रॉन्ग’ कंपनीचे २० लीटर क्षमतेचे पाण्याचे जार भेट देऊन गौरविण्यात आले. या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

​विविध संघटनांचे अनमोल सहकार्य

या यशस्वी उपक्रमात धरणगाव परिसरातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे अनमोल सहकार्य लाभले. यामध्ये राजपूत समाज पंच मंडळ, महाराणा प्रतापसिंह चौफुली समिती, राजपूत व्यायाम शाळा, काकासट मित्र मंडळ (शेंडी ग्रुप), श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, विश्व हिंदू परिषद बजरंग दल, महाराणा प्रतापसिंह स्मारक अभियान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्रीराम सेना, समस्त राजपूत समाज धरणगाव तालुका आणि राष्ट्रीय क्षत्रिय महासभा या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

​रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आयोजकांनी रक्तदानासाठी आलेल्या वैद्यकीय टीमचे, उपस्थित सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि संस्थेच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले. ‘एक बाटली रक्त – अनेकांचे जीवन वाचवू शकते’ ही भावना मनात ठेवून धरणगावकरांनी दिलेले हे योगदान अत्यंत कौतुकास्पद ठरले आहे, अशी प्रतिक्रिया आयोजकांनी व्यक्त केली.

Previous Post

धरणगाव येथील विक्रांत पाटील यांचे निधन

Next Post

केतन अग्रवाल हत्याकांडातील संशयित सिया आणि चेतनच्या कोठडी वाढ

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
केतन अग्रवाल हत्याकांडातील संशयित सिया आणि चेतनच्या कोठडी वाढ

केतन अग्रवाल हत्याकांडातील संशयित सिया आणि चेतनच्या कोठडी वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

September 4, 2026
धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

August 28, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

August 25, 2026
धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

August 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914