न्यूयॉर्क, वृत्तसंस्था – आपल्या सैनिकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने सिरियात इस्लामीक स्टेट आयएसआयएसच्या ठिकाणांवर घातक हल्ला केला. या हल्ल्यानंतर जगभरात खळबळ उडाली. काही तास हे हवाई हल्ले सुरू होते. अमेरिकेच्या कमांडने हवाई हल्ल्याबद्दल माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानंतर हा हल्ला करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 डिसेंबर 2025 रोजी सीरियातील पलमायरा येथे आयएसआयएस हल्ला केला होता. त्यामध्ये अमेरिकी सैनिक ठार झाले होते. त्याचाच बदला म्हणून हा हल्ला अमेरिकेकडून करण्यात आला.
याबाबत बोलताना शनिवारी अमेरिकेने म्हटले की, आमचा मेसेज स्पष्ट आणि थेट आहे की, जर तुम्ही आमच्या सैनिकांना नुकसान पोहोचवत असाल तर जगातील कोणत्याही कोपऱ्यात लपून बसा तुम्हाला शोधू शोधू मारणार. तुम्ही कितीही वाचण्याचा प्रयत्न करा पण तसे होणार नाही. दहशतवाद रोखण्यासाठी आम्ही कोणताही विचार करणार नाहीत. अमेरिकच्या सैन्याने इस्लामिक स्टेट्सच्या तब्बल 70 ठिकणी हल्ला केला.
शनिवारी अमेरिकेच्या कारवाईत आयएसआयएसचे कंबरडे मोडल्याचे सांगितले जात आहे. अनेक दहशतवादी अमेरिकेच्या या हल्ल्यात मारले गेल्याचा दावा केला जात आहे. आयएसआयएस दहशतवादी संघटनेविरोधात अमेरिका आक्रमक भूमिका घेत आहे.





