धरणगाव, प्रतिनिधी – येथील नूतन विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ.संगीता देवालाल माळी यांची बिनविरोध निवड झाली. खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या निवडणुकीचे कामकाज निवडणूक अधिकारी अतुल महाजन यांच्या उपस्थितीत पार पडले. सौ. संगिता महाजन यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
याप्रसंगी संस्थेचे पॅनल प्रमुख धरणगाव शहरातील प्रसिद्ध उद्योगपती सुरेशनाना चौधरी, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, संस्थेचे सर्व संचालक मंडळ विश्वास बयस, शालिक मराठे, किशोर कंखरे, राजेंद्र चव्हाण, कैलास मराठे, जयराम पाटील, राजेंद्र पवार, सुभाष महाजन, सोमा साळी, सुरेखा पाटील. माळी समाजाचे अध्यक्ष व्ही.टी.माळी, उपाध्यक्ष सोमनाथ महाजन, सचिव आर.डी.महाजन, माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, नगरसेवक परमेश्वर महाजन, नगरसेवक युवा सेना उपजिल्हाप्रमुख हेमंत महाजन, रामायण मढीचे सचिव रामभाऊ महाजन, माजी चेअरमन गोपाल महाजन, लक्ष्मण महाजन, रमेश महाजन, सुखदेव माळी, कालिदास बाविस्कर तसेच प्रगतिशील शेतकरी निंबा निकम, विजय महाजन, पुनमचंद महाजन, जयेश महाजन, देवालाल महाजन, दयाराम मराठे. नाना पाटील, कैलास महाजन, मयूर महाजन, दुर्गेश महाजन यांच्यासह संस्थेचे कर्मचारी सेक्रेटरी भिकनसिंग परिहार, लिपिक छगन पाटील, शिपाई ज्ञानेश्वर पुरभे आदी उपस्थित होते.
शेतकरी सभासदांच्या हिताला प्राधान्य – सौ.संगिता महाजन
नुतन विकासो ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. या संस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. संस्था आणि सभासद शेतकरी बांधवांच्या हितासाठी काम करणार असून आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू असा निर्धार नवनिर्वाचित चेअरमन सौ.संगिता देवालाल महाजन यांनी ‘खान्देशदूत’ सोबत बोलताना व्यक्त केला.





