• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आ. राहुल ढिकले यांच्या पत्नी वैशालीताईंचे अकस्मात निधन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम रद्द करून घेतले अंत्यदर्शन

खान्देशदूत by खान्देशदूत
April 25, 2026
in महाराष्ट्र
0
आ. राहुल ढिकले यांच्या पत्नी वैशालीताईंचे अकस्मात निधन
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिक, प्रतिनिधी – पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या पत्नी सौ. आदिती (वैशाली) राहुल ढिकले (वय ४०) यांचे शनिवारी, २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात दुःखद निधन झाले आहे.

आदिती ढिकले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शुक्रवारी रात्री नाशिकमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंत्यदर्शन

नाशिक दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची माहिती मिळताच आ. राहुल ढिकले यांच्या नागचौकातील निवासस्थानी भेट देऊन आदिती ढिकले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि ढिकले कुटुंबाचे सांत्वन केले.

कार्यक्रम रद्द: या दुःखद घटनेमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमधील त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केले.

अंत्यसंस्कार: शनिवारी सायंकाळी पंचवटीतील गणेशवाडी अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात आदिती ढिकले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पती आमदार राहुल ढिकले, एक मुलगा आणि परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने नाशिकच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.

Previous Post

चाळीसगावात रेल्वे प्रकल्प श्रेयाच्या लढाईला विरोधकांचा तडका

Next Post

अमेरिका हादरली : ट्रंम्प यांच्यावर हल्ला

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
अमेरिका हादरली : ट्रंम्प यांच्यावर हल्ला

अमेरिका हादरली : ट्रंम्प यांच्यावर हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

September 4, 2026
धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

August 28, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

August 25, 2026
धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

August 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914