धरणगाव, प्रतिनिधी – तालुका प्रवासी मंडळाने धरणगाव ते पुणे ही एस.टी. बस पुर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. यासह विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.
धरणगाव तालुक्यातील प्रवास्यांच्या विविध समस्या व मागण्यांबाबत तालुका प्रवासी मंडळातर्फे एरंडोल आगारप्रमुख श्री. बेंडकुळे यांना दुरध्वनीव्दारे संपर्क साधण्यात आला. श्री.बेंडकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वतः धरणगाव येथे येऊन प्रवासी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या ऐकून घेतल्या. याप्रसंगी मंडळातर्फे धरणगाव- पुणे बस पूर्ववत सुरू करावी, धरणगाव – जळगाव शटल बस सुरू करावी,
दुपारच्या वेळेस धुळ्याकडे जाण्यासाठी बस नाही त्यासाठी नवीन बस सुरू करावी, सकाळी 9 बाजेच्या सुमारास धरणगाव नाशिक बस सुरू करावी,धरणगाव पुणे स्लीपर बस रात्री सुरू करावी, चोपडा-चाळीसगाव बसला गणेश नगरसाठी थांबा द्यावा, सकाळी रेल्वे कनेक्टेड बस सुरू करावी, जळगाव-नवसारी बस पूर्ववत सुरू करावी, बस स्थानक परिसरात बेंचेस ठेवून बसण्यासाठी व्यवस्था करावी आदी मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कोठारी, उपाध्यक्ष रवींद्र भागवत, सचिव एस.डब्ल्यू.पाटील, किरण वाणी, हितेश पटेल, सुनील चौधरी, आनंद बाचपेयी, राजेंद्र पडोळ, राजेश मकवाने, डॉ. पंकज अमृतकर, डॉ. स्वप्नील पाटील, ऍड. हर्षल चव्हाण, किरण परिहार, बाबा कासार, सुदाम चौधरी आदी उपस्थित होते.





